'खेलरत्न' शिफारस: गोल्डन बॉयसह मिताली, सुनील छेत्रीही शर्यतीत

टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्या 9 खेळाडूंची खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली आहे.
Major Dhyan Chand Khel Ratna Awards
Major Dhyan Chand Khel Ratna AwardsSakal
Summary

टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्या 9 खेळाडूंची खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली आहे.

Major Dhyan Chand Khel Ratna Awards 2022 Nomination : क्रीडा क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी 11 खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यात ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रासह कुस्तीपटू रवी दाहिया, महिला बॉक्सर लोवलिना बोर्गोहेन यांचा समावेश आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी ज्या खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यात भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकिपर श्रीजेश, नेमबाज अवनी लेखारा, पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा सुमित अंतील, प्रमोद भगत, कृष्णा नागर, मनिष नरवाल, मिताली राज आणि सुनील छेत्री यांच्या नावांचाही समावेश आहे. फुटबॉल क्षेत्रातून खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकित होणारा सुनील छेत्री हा पहिला फुटबॉलपटूही ठरलाय.

Major Dhyan Chand Khel Ratna Awards
भारत-पाकच्या खेळाडूंबद्दल हेडनने व्यक्त केले मत; म्हणाला...

अर्जून पुरस्कारासाठी एकूण 35 खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यात योगेश कथूरिया, निषाद कुमार, प्रवीण कुमार, शरद कुमार, सुहास एलवाई, सिंघराज अधाना, भाविना पटेल, हरविंदर सिंह, शिखर धवन यांच्यासह भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्व खेळाडूंचा समावेश आहे. हॉकी संघातील गोल किपर श्रीजेशच्या नावाचा समावेश हा खेलरत्न पुरस्काराच्या यादीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com