

Malaysia Masters 2023 HS Prannoy : भारताच्या एचएस प्रणयने मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. त्याने चीनच्या वेंग हाँग येंगचा तीन गेममध्ये पराभव करत आपली पहिली वहिली BWF वर्ल्ड टूर जिंकली. 30 वर्षाच्या प्रणयने 94 मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 34 व्या स्थनावर असलेल्या वेंगला 21 - 19, 13 - 21, 21 - 18 अशा तीन गेममध्ये पराभूत केले.
प्रणयने मलेशिया आणि इंडोनेशिया सुपर 1000 स्पर्धेत देखील सेमी फायनल गाठली होती. रविवारी जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या प्रणयने चीनच्या 23 वर्षाच्या खेळाडूविरूद्ध दमदार कामगिरी करत विजय मिळवला. या आठवड्यात प्रणयने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या चाऊ टिएन चेन आणि ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंग आणि जपानच्या केंटा निशिमोटाला देखील पराभवाची धूळ चारली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.