IPL 2023 GT vs CSK Final : फायनल ढकलली पुढे! आता राखीव दिवशी मिळणार चॅम्पियन

IPL 2023 GT vs CSK Final LIVE
IPL 2023 GT vs CSK Final LIVEesakal

IPL 2023 GT vs CSK Final : आयपीएल 2023 ची अंतिम रात्र जबरदस्त अॅक्शन, थरारक स्पर्धा आणि सुंदर विजेतेपदाच्या सेलिब्रेशनची वाट पाहणाऱ्या करोडो चाहत्यांसाठी अँटी-क्लायमॅक्समध्ये बदलली. अहमदाबादमध्ये अवकाळी पावसामुळे रविवार 28 मे रोजी चेन्नई सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 चा अंतिम सामना खेळला जाऊ शकला नाही. आता हा सामना सोमवार 29 मे रोजी राखीव दिवशी होणार आहे.

पंचांनी अखेर सांगितले

फायनल कधी सुरू होणार याचा अख्खा भारत वाट पाहत असताना पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. अखेर पंचांनी 10 वाजून 30 मिनिटांनी सामन्याच भविष्य काय असेल याची माहिती दिली. त्यांनी सांगितले जर पाऊस 11 वाजता थांबला तर प्रत्येकी 5 षटकांचा सामना होईल. मात्र जरी पाऊस थांबला तरी मैदान तयार करण्यासाठी जवळपास 1 तास लागले.

पावसाची उसंत पण.. 

पावसामुळे सामन्याची षटके घटवण्याची वेळ जवळ येत असतानाच पावासाने उसंत घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. अंपायर्स मैदानात आले खेळपट्टीवरील कव्हर देखील हटवण्यात आली. आता सामना सुरू होणार असे वाटत असतानाच पावसाने पुन्हा सुरूवात केली.

आता जर सामना 9 वाजून 45 मिनिटांनी सुरू झाला तर तो 19 षटकांचा, 10 वाजता सुरू झाला तर 17 षटकांचा आणि 10 वाजून 30 मिनिटांनी सुरू झाला तर तो 15 षटकांचा होईल.

 षटके घटवण्यास कधी होणार सुरूवात?

नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजून नाणेफेक झालेली नाही तसेच आता 9.35 पासून सामन्याची षटके घटवण्यास सुरूवात केली जाईल.

पावसाचा लपंडाव, राखीव दिवसाबाबत मोठी अपडेट

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने लपंडाव सुरू केला आहे. कधी पाऊस उसंती घेतोय तर कधी कोसळतोय. या सर्व घडामोडीत सामन्याच्या राखीव दिवसाबाबत निर्माण झालेला गोंधळ अखेर दूर झाला आहे. जर सामना 9.35 पर्यंत सुरू झाला तर तो सामना पूर्ण 20 षटकांचा खेळवण्यात येईल. सामन्याचा कट ऑफ टाईम हा 12 वाजून 6 मिनिटे ठेवण्यात आला आहे. तसेच जर आज सामना झालाच नाही तर उद्याचा दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे. मात्र उद्या देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाऊस असाच सुरू राहिला तर...

अहमदाबादमध्ये पाऊस असाच सुरू राहिला तर काय होणार वाचा सविस्तर :

CSK vs GT IPL Final 2023 : अहमदाबादमध्ये पाऊस झाला सुरू! सामना रद्द झाल्यावर कोण होणार चॅम्पियन?

अहमदाबादमध्ये पावसाला सुरूवात

धोनीचा शक्यतो शेवटचा आयपीएल सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. या फायनलच्या सांगता समारंभाची बीसीसीआयने देखील दमदार तयारी केली होती. मात्र पावसाने यावर पाणी फेरण्यास सुरूवात केली आहे.

अहमदाबादमध्ये फक्त धोनीचेच चाहते.

गुजरात टायटन्स जरी चेन्नई विरूद्धची फायनल मॅच आपल्या होम ग्राऊंड नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळत असली तरी या सामन्यात सगळा सपोर्ट हा धोनीलाच असणार आहे. स्टेडियमबाहेर धोनीच्याच चाहत्यांची गर्दी दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com