
Manish Sureshkumar and Vaishnavi Adkar
Sakal
तमिळनाडूचा मनिष सुरेशकुमार आणि महाराष्ट्राचा वैष्णवी अडकरने आपली जिंकण्याची घोडदौड अखेरपर्यंत सुरू ठेवत, डिएलटीए कॉम्पलेक्स नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ३० व्या फिनेस्टा ओपन नॅशनल टेनिस स्पर्धेमध्ये शनिवारी पुरूष आणि महिला एकेरी सामन्यांचे अंतिम सामने जिंकले आणि विजेतेपदाचा मान मिळवला.
दोन तास चाललेल्या खेळामध्ये आपले सातत्य आणि दबाव कायम ठेवत, मनिष सुरेशकुमारने क्रिथीवासन सुरेशला पुरूष एकेरी सामन्यात ६-४, ६-२ असे पराभूत केले.