Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 Tribute: विक्रोळी येथील नऊ वर्षीय जलतरणपटू मंथन मुरलीधर बांदे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अद्वितीय आणि प्रेरणादायी पराक्रम गाजवला आहे. त्याने अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर जलतरण करण्याचे आव्हान स्वीकारले आणि ते मोठ्या आत्मविश्वासाने पूर्ण केले. नियोजित १२ किलोमीटरचे अंतर वाऱ्याच्या प्रतिकूल दिशेमुळे आणि समुद्राच्या प्रवाहामुळे १५-१६ किलोमीटरपर्यंत वाढले. तरीही, मंथनने अवघ्या ६ तास २ मिनिटांत हे अंतर पार करत ऐतिहासिक कामगिरी साकारली.