
Khel Ratna Award: ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांचे पुरस्कार प्रदान केले जातील.