
Major Dhyan Chand Khel Ratna award : भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकली होती. पण, तिची मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही रामासुब्रमणियम यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय निवड समितीने या पुरस्कारासाठी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा खेळाडू प्रवीण कुमार यांच्या नावाची शिफारस केली आहे. पण, देशातील या सर्वोच्च पुरस्कारासाठी Manu Bhaker चे नाव नसल्याने नेमबाजाचे वडील रामकृष्णा यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी निराशा व्यक्त केली आहे.