Maratha Reservation : वर्ल्डकप सामन्यापर्यंत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Maratha Reservation World Cup 2023
Maratha Reservation World Cup 2023esakal
Updated on

Maratha Reservation World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 चा अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका हा सामना पुण्याच्या गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर होत आहे. या सामन्यावेळी पोलीस आणि प्रशासन हे अत्यंत सतर्क असल्याचे दिसून आले.

जरी आजचा सामना भारताचा नसला तरी पोलिसांनी स्टेडियमवर येणाऱ्या चाहत्यांना काळे कपडे घालून येण्यावर बंदी घातली होती. याला निर्णयाला महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावरून तापलेल्या वातावरणाची किनार होती.

Maratha Reservation World Cup 2023
AFG vs SL : चिंताजनक घटना; श्रीलंकेच्या राष्ट्रगीतावेळी खेळाडूंचे लक्ष झाले विचलित, उभा असलेला बॉल बॉय...

गहुंजेमधील स्टेडियममध्ये काळे कपडे घालून येणाऱ्या चाहत्यांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रशासनाने हा निर्णय सामना सुरू होण्यापूर्वीच घेतला होता.

स्टेडियमवर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला.

मराठा आरक्षण आंदोलनाचे सध्या जालना येथील आंतरवाली हे केंद्रबिंदू ठरले आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसले आहेत. आज उपोषणाचा सहावा दिवस असून हळूहळू आंदोलनाला हिंसक वळण देखील लागत आहे.

Maratha Reservation World Cup 2023
Maratha Reservation : गेवराईचे आमदार लक्ष्मण पवारांनी दिला राजीनामा; पत्रामध्ये काय म्हटलंय?

राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर काही तरूणांनी दगडफेक केली अन् त्यांच्या पार्किंगमधील सर्व गाड्यांना आग लावली. याचबरोबर बीड मधील राष्ट्रवादीचे कार्यालय आणि जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयावरही पेटवण्यात आले आहे.

बीडमध्ये एसटीवर देखील दगडफेक झाली होती. त्यानंतर राज्यातील एसटी सेवा देखील प्रभावित झाली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com