नाशिकमध्ये शनिवारी "एमआरएफ मोग्रीप रॅली'चा थरार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

नाशिक : स्पर्धेत मोठे फेरबदल करणाऱ्या पुण्यातील फेरीनंतर येत्या शनिवारी (ता.26) "एमआरएफ मोग्रीप रॅली ऑफ नाशिक' च्या चौथ्या फेरीतील चालकांच्या (रायडर्स) कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. स्पर्धेतील विजेतेपदासाठी कोईमतूर आणि मंगळूर अशा दोन फेऱ्या बाकी असल्या तरी नाशिकमध्ये होत असलेली फेरी निर्णायक ठरू शकते. शहराच्या सीमेवर असलेल्या सारूळ येथील डोंगराळ मार्गावर गेल्या वर्षी प्रमाणे यंदा ही फेरी होईल. 

नाशिक : स्पर्धेत मोठे फेरबदल करणाऱ्या पुण्यातील फेरीनंतर येत्या शनिवारी (ता.26) "एमआरएफ मोग्रीप रॅली ऑफ नाशिक' च्या चौथ्या फेरीतील चालकांच्या (रायडर्स) कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. स्पर्धेतील विजेतेपदासाठी कोईमतूर आणि मंगळूर अशा दोन फेऱ्या बाकी असल्या तरी नाशिकमध्ये होत असलेली फेरी निर्णायक ठरू शकते. शहराच्या सीमेवर असलेल्या सारूळ येथील डोंगराळ मार्गावर गेल्या वर्षी प्रमाणे यंदा ही फेरी होईल. 

रॅलीचे क्‍लर्क ऑफ दी कोर्स अमित वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहीती दिली. पुण्यात झालेल्या फेरीत पराभूत गत वेळचा विजेता टीव्हीएस रेसिंग संघाचा आर.नटराज याला दावेदारीची तर टीव्हीएस रेसिंगचा राजेंद्र आर. ई. याला आघाडी घेण्याची संधी असेल. पत्रकार परीषदेस चीफ स्टीव्हर्ड प्रशांत गडकरी, छाननी समितीचे प्रमुख रवी वाघचौरे उपस्थित होते. शुक्रवारी (ता.25) स्पर्धेत सहभागी झालेल्या वाहनांची स्पर्धापूर्व तपासणी व कागदपत्रांची छाननी होईल.

सकाळी अकराला हॉटेल सुमनचंद्र येथून रॅलीची सुरवात होईल. यावेळी पोलिस अधिक्षक संजय दराडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. दुपारी स्पर्धकांना रॅलीचा मार्ग दाखविण्यात येईल. स्पर्धकांच्या शंकांचे निरसन केले जाईल. शनिवारी (ता.26) सकाळी सातपासून सारूळ येथून रॅलीची स्पर्धात्मक रंगत बघायला मिळेल. तीन फेऱ्यांच्या चुरशीच्या लढतीनंतर प्रारूप स्वरूपतील निकालाची घोषणा केली जाईल. सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. नाशिकच्या ए. डब्ल्यू इव्हेंट्‌सने या पहिल्या चारही राष्ट्रीय फेऱ्यांचे आयोजन केले आहे. 

सुपर स्पोर्ट गटात लढत 
विदेशी बनावटीच्या पहिल्या गटात नटराजची एक मात्र प्रवेशिका असून स्पर्धेची सर्वात तीव्र लढत सुपर स्पोर्ट 260 या चौथ्या गटात आहे. राजेंद्र व नटराज यांच्यात पहिल्या दोन स्थानांसाठी लढत हा गेल्या वर्षापासून सुरू असलेले समिकरण मोडीस निघेल का, हे पाहणे औत्सुक्‍याचे असेल. त्यासाठी पहिल्या दोन्ही फेऱ्या जिंकणारा सुहेल अहमद आणि पुणतील सुहेलला नमवून हंगामात प्रथमच तिसरा क्रमांक पटकावणारा सॅम्यूल जेकब यांची कामगिरी महत्वाची ठरणार आहे. 

महिला रायडर्स,स्थानिकांच्या कामगिरीकडे लक्ष 
महिला खुल्या गटात ऐश्‍वर्य पी. एम. हि टिव्हीएस आरटीआर 200 चालविणारी टीम टीव्हीएस रेसिंग संघाची रायडर आहे. गेल्यावर्षाप्रमाणे तिने यंदाही उत्तम कामगिरी कायम राखली आहे. पहिल्या तिनही फेऱ्या जिंकून तीने वर्चस्व राखले आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या फेरीत तिच्यासमोर हिरो इम्पल्सवर स्वार झालेल्या फझिला, गुरमेल कौर, कोल्हापूरची पल्लवी यादव यांच्याशी करडी लढत द्यावी लागेल. विविध गटात शमीम खान,हितेन ठक्कर,युवराज पाटील,मोहन पवार, निलेश ठाकरे हे चालक सहभागी झाले असून त्यांच्याही कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: marathi news mrf mogrip rally