बॅडमिंटन : इंडोनेशियाविरुद्ध भारताला सिंधूच्या विजयाचे समाधान 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

अलोस सेटर (मलेशिया) : आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. जपानविरुद्ध हरल्यानंतर शुक्रवारी भारताला इंडोनेशियाविरुद्ध उपांत्यपूर्व लढतीत 1-3 असा पराभव पत्करावा लागला. भारताला पी. व्ही. सिंधूने मिळविलेल्या एकमात्र विजयाचे समाधान लाभले. 

एकेरीच्या लढतीत सिंधूने इंडोनेशियाच्या फित्रिनीचा 21-13, 24-22 असा पराभव करून भारताला झकास सुरवात करून दिली होती. मात्र, त्यानंतर भारताला तीनही लढती गमवाव्या लागल्या. 

दुहेरीच्या लढतीत अश्‍विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी ग्रेसिया पोली-अप्रियानी राहायु यांचा सामना करू शकली नाही. एकेरीच्या दुसऱ्या लढतीत प्रिया कुद्रावल्ली प्रतिस्पर्धी हॅना रामदिनीसमोर आव्हान उभे करू शकली नाही. दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत सिंधू संयोगिता घोरपडेसह खेळली देखील पण, तिला एकेरीतील सातत्य राखता आले नाही. 

पुरुषांचाही पराभव 
भारतीय पुरुषांनाही चीनकडून 1-3 अशा पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून एकमात्र विजय के. श्रीकांतलाच मिळविता आला. त्यानंतर दुहेरीच्या दोन्ही लढती आणि साईप्रणितने एकेरीची लढत गमाविल्यामुळे भारतीय पुरुष संघाचेही आव्हान संपुष्टात आले. 

निकाल 
पुरुष : चीन वि. वि. भारत 3-1(शी युकी पराबूत वि. के. श्रीकांत 21-14, 16-21, 7-21, हे जिटिंग-टॅन क्विआंग वि. वि. सत्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी 21-17, 21-18, क्विआओ बिन वि. वि. बी. साईप्रणित 9-21, 21-11, 21-17, हॅन चेंगकाई-होऊ हाओडॉंग वि. वि. मनु अत्री-बी. सुमीत रेड्डी 14-21, 21-19, 21-14 

महिला : भारत पराभूत वि. इंडोनेशिया 1-3 (पी. व्ही. सिंधू वि. वि. फित्रिआनी 21-13, 24-22, अश्‍विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी प. वि. ग्रेसिया पोल्ली-अप्रियानी राहायू 5-21, 16-21, प्रिया कुड्रावेली प. वि. हॅना रामदिनी 8-21, 15-21, पी. व्ही. सिंधू-संयोगिता घोरपडे प. वि. ऍन्जिया शिटा अवांडा-महाडेवी इस्ताराणी 9-21, 18-21

Web Title: marathi news PV Sindhu Asian Badminton Championship