सौराष्ट्राच्या दिवसअखेर3 बाद 269 धावा, विश्‍वराज जडेजाचे शतक हुकलेः

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नाशिक  रणजी स्पर्धेच्या महाराष्ट्र विरूध्द सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात पहिल्या दिवसअखेर सौराष्ट्र संघाने 84 षटकात 3 बाद 269 धावा केल्या. रणजी सामन्यात पदार्पण करणाऱ्या विश्‍वराज जडेजाने 154 चेंडूत 97 धावा केल्या. त्यांचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. स्नेहिल पटेल(55 धावा) हर्विक देसाई (84 धावा) यांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढविण्यात हातभार लावला. महाराष्ट्राच्या अनुपम संकलेचाने दोन तर अक्षय पालकरने एक गडी बाद केला. 

नाशिक  रणजी स्पर्धेच्या महाराष्ट्र विरूध्द सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात पहिल्या दिवसअखेर सौराष्ट्र संघाने 84 षटकात 3 बाद 269 धावा केल्या. रणजी सामन्यात पदार्पण करणाऱ्या विश्‍वराज जडेजाने 154 चेंडूत 97 धावा केल्या. त्यांचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. स्नेहिल पटेल(55 धावा) हर्विक देसाई (84 धावा) यांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढविण्यात हातभार लावला. महाराष्ट्राच्या अनुपम संकलेचाने दोन तर अक्षय पालकरने एक गडी बाद केला. 

येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आजपासून या सामन्याला सुरवात झाली. महाराष्ट्र संघाचा कर्णधार अंकित बावणे यांने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. हर्विक देसाई व स्नेहिल पटेल यांनी सौराष्ट्राच्या डावाला सुरवात केली. सुरवातीपासूनच एकेरी दुहेरी धावसंख्या उभारण्यास या दोघांनी संयमी खेळास प्राधान्य देत संघाची धावसंख्या वाढवली. धावसंख्या 33 व 55 असतांना अनुक्रमे कर्णधार अंकित बावणे व केदार जाधव यांनी झेल सोडले. संघाचे शतक फलकावर झळकविण्यास 2 धावा बाकी असतांना अनुपम संकलेचाने हर्विकला (99 चेंडूत 55 धावा) पायचित करत सौराष्ट्रला पहिला धक्का दिला.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विश्‍वराज जडेजाने वेगाने धावा जमा करण्याचे तंत्र अवलबंत स्नेहिलला हाती घेतले. विश्‍वराजने पंधरा चौकारांसह एक उतुंग षटकार खेचत मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. या दोघांनी संघाचे शतक व द्विशतकही फलकावले लावले. विश्‍वराजच्या शतकासाठी अवघ्या तीन धावा बाकी असतांना तो अंकित पालकरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक रोहित मोटवाणीच्या हाती झेल देत बाद झाला. पुढच्याच षटकात पुन्हा अनुपमने मैदानावर जम बसलेल्या स्नेहिलला(212 चेंडूत84) चिराग खुरानाकडे झेल देण्यास बाद करत सौराष्ट्र संघाची अवस्था 3 बाद 245 अशी करून टाकली. त्यानंतर मैदानावर आलेल्या शेल्डॉन जॅक्‍सन आणि अर्पित वासवदा यांनी कुठलीही पडपड होऊ न देता एकेरी दुहेरी धावा जमा केल्या.

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात केलेल्या चूकांमुळे सौराष्ट्र संघ अडीचशेचा पल्ला गाठण्यास यशस्वी झाला. उद्या हा संघ आणखी किती धावा जमा करतो. याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी सकाळी आमदार सीमा हिरे,देवयांनी फरांदे,महापौर रंजना भानसी,जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन्, पोलिस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंघल आदीच्या उपस्थित फुगे सोडून सामन्याचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी पंच,सामनाधिकारी,कर्णधारांचा सत्कार करण्यात आला.

अंतिम धावफलक 
सौराष्ट्र पहिला डाव- हर्विक देसाई पायचित, गो.अनुपम संकलेचा(99 चेंडूत 55 धावा),स्नेहिल पटेल झे.खुराणा,गो.अनुपम संकलेचा,विश्‍वराज जडेजा झे.यष्टीरक्षक रोहित मोटवाणी गो.अक्षय पालकर,शेल्डॉन जॅक्‍सन नाबाद 12,अर्पित वासवदा नाबाद 11,अतिरिक्त 10, एकूण 84 षटकात 3 बाद 269 धावा 
गोलंदाजी- (षटक,निर्धारित,धावा,गडी बाद या क्रमाने) 
-अनुपम संकलेचा-20,1,84,2 
-समंद फल्लाह-23,10,42,0 
-सत्यजित बच्छाव-11,3,37,0 
-अक्षय पालकर-14,3,51,1 
-राहुल त्रिपाठी-13,3,25,0 
-चिराग खुराणा-3,0,23,0 
एकूण-84 षटकात 3 बाद269 धावा, 

Web Title: marathi news ranji match 14 dec