विश्‍वकरंडक नेमबाजीत भारताचे अग्रस्थान कायम 

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई : मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतास एकही पदक जिंकता आले नाही. ट्रॅप प्रकारात भारतीयांना अंतिम फेरीपासूनही दूर राहावे लागले; पण भारताने पदक क्रमवारीतील अग्रस्थान पहिल्या तीन दिवसांतील चमकदार कामगिरीमुळे कायम राखले आहे. 

स्पर्धेच्या पाचव्या दिवशी ट्रॅपची मिश्र दुहेरीची स्पर्धा होईल. त्यात भारताच्या दोन जोड्यांचा सहभाग असेल. मानवजीतसिंग संधू आणि श्रेयासी सिंग ही भारत एक जोडी असेल तर क्‍यानन चेनाई - सीमा तोमर ही भारत दोन जोडी असेल. ट्रॅपच्या वैयक्तिक प्रकारात भारतीय पुरुष अव्वल तीसमध्येही आले नाहीत. भारतीयात सर्वोत्तम कामगिरी झोरावर सिंगने केली. त्याने 125 पैकी 114 गुण मिळवले. तो 32 वा आला. क्‍यानन चेनाई (107) हा 44 वा आला; तर मानवजीतसिंग संधू स्पर्धाच पूर्ण करू शकला नाही. 

दरम्यान, तीन सुवर्णपदकांसह सात पदके जिंकलेला भारत पदक क्रमवारीत अव्वलच आहे. मनू भाकर आणि अंजुम मुदगील पिस्तूल प्रकारात पदके वाढवतील; तसेच अनिष भानवाला (रॅपिड फायर पिस्तूल), स्वप्नील कुसळे, अखिल शेओरान (रायफल थ्री पोझीशन), अंगद बाजवा (स्कीट) यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची आशा आहे.

चीन, रुमानिया, अमेरिका हे प्रत्येकी दोन पदके जिंकून पदक क्रमवारीत संयुक्त दुसरे आहेत.

Web Title: marathi news sports news World Cup Shooting