कोहलीचे जगभरातून "विराट' कौतुक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

वन डेतील सर्वकालीन श्रेष्ठ - क्‍लार्क, मियॉंदादकडूनही कौतुक 

नवी दिल्ली -  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त दीडशतकी खेळी केल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्कने विराट एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वकालीन श्रेष्ठ फलंदाज असल्याचे म्हटले आहे; तर जावेद मियॉंदाद यांनी विराट जिनियस असून, तो क्रिकेट विश्‍वातील सर्वोत्तम फलंदाज असल्याची शाबासकी दिली आहे. 

बुधवारी झालेल्या सामन्यात कोहलीने 34 वे शतक केले, त्यामुळे भारताने न्यूलॅंड येथे झालेल्या सामन्यात 124 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचे इतर प्रमुख फलंदाज बाद होत असताना विराटने दुसऱ्या बाजूने खंबीर फलंदाजी करत नाबाद दीडशतक केले. विराटच्या या खेळीनंतर ट्विटवरून त्याचे कौतुक होत आहे. 
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि विराटएवढीच आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या डेव्हिड वॉर्नरने कोहली हा वेगळ्या उंचीवर आहे, असे म्हटले आहे. 
एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने 2017 हे वर्षही आपल्या फलंदाजीने गाजवले होते. 26 सामन्यांत 76.84 ची सरासरी आणि 99.11 च्या स्ट्राईक रेटने त्याने सर्वाधिक 1,460 धावा केलेल्या होत्या. आता 2018 चीही सुरवात त्याने तेवढ्याच जोमाने केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत डर्बन येथे शतक केल्यानंतर विराटने काल पुन्हा 159 चेंडूंत नाबाद 160 धावा केल्या. 

मियॉंदादकडूनही कौतुक 
पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियॉंदाद यांनीही विराटला "जिनियस' संबोधून तो क्रिकेट विश्‍वातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे. मुळात भारतीय फलंदाज फलंदाजीच्या तत्रांत उजवे आहेत. विराटची फलंदाजीशैली इतकी जबरदस्त आहे, की तो मैदानावर आल्यापासून सहजतेने धावा करू शकतो. तुमच्या तंत्रात जर दोष असेल तर अधूनमधून तुम्ही एखादी चांगली खेळी करू शकता; परंतु त्यात सातत्य नसते; पण तंत्र जर भक्कम असेल तर धावांचा पाऊस पाडला जाऊ शकतो. विराट याच पंक्तीतला आहे, असे मियॉंदाद यांनी नमूद केले. 
 
Web Title: marathi news virat kohli cricket sport