माझं क्रिकेट संपलेलं नाही.. आणखी दोन वर्षे खेळू शकतो : युवराज 

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई : 'अजूनही माझ्यातील क्रिकेट संपलेलं नाही. भारतासाठी पुन्हा खेळायचे ही इच्छा अजूनही कायम आहे. 'आयपीएल'मध्येही मी आणखी दोन-तीन वर्षे खेळू शकतो', असा विश्‍वास भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराजसिंगने व्यक्त केले. 'स्पोर्टसस्टार'ला दिलेल्या मुलाखतीत युवराजने त्याच्या क्रिकेटविषयक प्रवासाविषयी मते मांडली. 

'प्रकृतीचं कारण नसतं, तर माझे कसोटीतील करिअरही यशस्वी होऊ शकले असते' असे युवराज म्हणाला. 36 वर्षीय युवराजने भारतासाठी दोन विश्‍वकरंडक स्पर्धांमध्ये मोलाची कामगिरी केली आहे. पण कसोटीमध्ये तो छाप टाकू शकला नाही. 

गेल्या काही महिन्यांपासून त्याचा सूर हरपल्याने भारताच्या संघातूनही तो बाहेर आहे. तीन वर्षांहून अधिक विश्रांतीनंतर गेल्या वर्षी जानेवारीत त्याला एकदिवसीय संघात पुन्हा स्थान मिळाले होते. त्यानंतर तो चॅंपियन्स करंडक स्पर्धेसह एकूण 11 सामने खेळला. पण त्यानंतर त्याला संघातून पुन्हा बाहेर जावे लागले. गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या दुलीप करंडक स्पर्धेसाठीही निवड समितीने युवराजला संधी दिली नाही. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर संपुष्टात आल्याचे मानले जाते. 

युवराज म्हणाला, "निवृत्तीची योग्य वेळ येईल, तेव्हा निर्णय घेण्याची माझी इच्छा आहे. खेळासाठी, देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केल्याच्या समाधानासह मला निवृत्त व्हायचे आहे. मी अजूनही खेळत आहे कारण यातून मला आनंद मिळतो. मी आणखी किमान दोन-तीन वर्षे आयपीएल नक्की खेळू शकतो.'' 

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली असली, तरीही कसोटीत प्रभावी कामगिरी करता न आल्याची खंत युवराजला आहे. 'कसोटी संघात स्थान मिळविण्यासाठी मला नेहमीच सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणशी स्पर्धा करावी लागली. एकदा तर कसोटीमध्ये सलामीलाही फलंदाजी केली आहे. पण त्या सामन्यात पहिल्या डावात मी आठ धावा करून बाद झालो आणि दुसऱ्या डावात फलंदाजी सुरू केल्यानंतर पावसामुळे सामनाच अनिर्णित राहिला. त्यामुळे ती संधीही गेली. गांगुली निवृत्त झाल्यावर त्याची जागा मला मिळाली; पण दुर्दैवानं त्याच दरम्यान मला कॅन्सर असल्याचे समोर आले. त्यावेळी मी सलग खेळू शकलो असतो, 80 हून अधिक कसोटींमध्ये कामगिरी करू शकलो असतो, तर चित्र कदाचित वेगळे असू शकले असते..', असे युवराज म्हणाला. 

Web Title: marathi news Yuvraj Singh IPL Test Cricket