Football News : फुटबॉलच्या चालू सामन्यात राडा! गोलरक्षकाला प्रेक्षकाकडून मारहाण

पीएसव्ही संघाच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात गोलरक्षक प्रेक्षकाकडून हल्ला
Marko Dmitrovic is ATTACKED
Marko Dmitrovic is ATTACKED

Marko Dmitrovic is ATTACKED : सेव्हिला आणि पीएसव्ही यांच्यातील युरोपा लीगच्या सामन्यात सेव्हिलाचा गोलरक्षक मार्को दिमित्रोविक याच्यावर एका प्रेक्षकाने हल्ला केला. आता या हल्ल्याप्रकरणी यूएफाने चौकशीस सुरवात केली आहे.

Marko Dmitrovic is ATTACKED
IND vs AUS: दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा! राहुलच्या जागी हा असेल टीम इंडियाचा उपकर्णधार

पीएसव्ही संघाच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सेव्हिलाचा गोलरक्षक मार्को दिमित्रोविक याच्यावर लढतीच्या उत्तरार्धात प्रेक्षकाकडून हल्ला करण्यात आला. त्या हल्लेखोर प्रेक्षकाने दिमित्रोविकच्या अंगावर धावत जाऊन त्याच्या चेहऱ्यावर ठोसे लगावले. दोघांमध्ये त्यामुळे शाररिक द्वंद्व झाले. यामुळे सामना नंतर थांबविण्यात आला.

Marko Dmitrovic is ATTACKED
Women Twenty20 World : सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीत भारताची केवळ रिचा घोष

व्यवस्थापकांनी हल्लेखोराला बाहेर काढले. युरोप खंडातील फुटबॉलचे व्यवस्थापन बघणाऱ्या युएफाने याविषयी सविस्तर निवेदन जाहीर केले नसले तरी, त्यांनी आपल्या वेबसाईटवर आपण या निंदनीय कृत्याबद्दल चौकशी सुरु केली आहे असे म्हटले आहे. हल्ल्यामुळे दुखापत झालेल्या दिमित्रोविक याने युएफाला या हल्ल्याबद्दल चौकशी करण्याची मागणी केली असून, मी माझ्या आयुष्यात याआधी असे कधीच अनुभवले नाही. माझ्या रागावर त्याक्षणी नियंत्रण आले म्हणून पुढे मी ते प्रकरण वाढवले नाही.

Marko Dmitrovic is ATTACKED
Tennis News : कतार ओपन स्पर्धेत बोपण्णाला विजेतेपद

माझ्यावर हल्ला करायचाच त्याचा हेतू होता, परंतु त्याने असे का केले हे मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल असे म्हणत त्याने सुद्धा युएफाला या हल्ल्याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. पीएसव्हीविरूद्धच्या या सामन्यात सेव्हिलाला २-० असे पराभूत व्हावे लागले असले तरी एकूण गोलफरकामुळे (३-२) सेव्हिलाच्या संघाने युरोपा लिबाद फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com