निवृत्ती घेणार आहेस की नाही? तो म्हणाला, प्लिज मला थोडासा वेळ हवाय

वृत्तसंस्था
Saturday, 17 August 2019

बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तजा विश्वकरंडक 2019 नंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. तो सध्या अत्यंत खराब फॉर्मात आहे तसेच त्याला दुखापतींही त्रस्त केले आहे. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याला निवृत्तीबाबत विचारले असता त्याने थोडा वेळ मागितला आहे. 

ढाका : बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तजा विश्वकरंडक 2019 नंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. तो सध्या अत्यंत खराब फॉर्मात आहे तसेच त्याला दुखापतींही त्रस्त केले आहे. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याला निवृत्तीबाबत विचारले असता त्याने थोडा वेळ मागितला आहे. 

मोर्तजाने विश्वकरंडकानंतर निवृत्ती घेणार असे सांगितले होते मात्र, बांगलादेशमध्ये परतल्यावर त्याने त्याचा निर्णय बदलला. त्याने आता क्रिकेट बोर्डीरकडे विचार करण्यासाठी वेळ मागितल्याने त्याला निरोप देण्यासाठी आयोजित करण्यात येणारा झिंबाब्वेविरुद्धचा एकदिवसीय सामनाही रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे. 

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आणि मोर्तझा यांची ईदनंतर बैठक होणार होती. मात्र, तीसुद्धा झाली नाही. त्यांची आज भेट झाल्यावर  त्याने बोर्डाकडे भविष्याचा विचार करण्यासाठी आणखी थोडा वेळ मागितला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mashrafe Mortaza Asks BCB For More Time To Decide His Future