IND vs AUS 1st ODI : ऐन पावसाळ्यात उकाड्यानं ऑस्ट्रेलियनच नाही तर टीम इंडियाचे खेळाडू देखील झाले हैराण

IND vs AUS 1st ODI
IND vs AUS 1st ODIesakal

IND vs AUS 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रचंड उकाड्यामुळे भारताचे सर्वच गोलंदाज चांगलेच हैरान झाले. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज देखील घामाने भिजले होते.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तर मैदानच सोडले. त्याच्या पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहला देखील चांगलाच दम लागला होता. थोड्या वेळाने गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या शार्दुल ठाकूरने देखील मोहालीतील उकाड्यासमोर गुडघे टेकले.

IND vs AUS 1st ODI
Mohammed Shami : पाटा खेळपट्टीवर पंजा! मोहालीने शमीला तर शमीने ऑस्ट्रेलियाला चांगलाच घाम फोडला

चार षटकानंतर शमीने सोडले मैदान

मोहम्मद शमीने मोहालीच्या उकाड्यात सलग चार षटके गोलंदाजी केली. मात्र त्यानंतर त्याला उष्णतेचा खूपच त्रास होऊ लागल्याने त्याने मैदान सोडले. यापूर्वी त्याने मिचेल मार्शला बाद करत कांगारूंना पहिला धक्का दिला होता. शमीने सामन्याच्या 7 व्या आणि आपल्या चौथ्या षटकानंतर मैदान सोडले. मात्र थोड्या वेळाने तो पुन्हा मैदानात आला अन् सामन्यात त्याने कांगारूंचा निम्मा संघ गारद केला.

जसप्रीत बुमराहलाही लागला दम

शमी पाठोपाठ नुकताच दुखापतीतून सावरलेल्या जसप्रीत बुमराहचीही उष्णतेने अवस्था खराब झाली. तो सीमारेषेवर फिल्डिंग करताना चांगलाच दमला असल्याचे जाणवले.

तो गुडघ्यावर हात ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी सपोर्ट स्टाफ देखील बुमराहजवळ पोहचला. त्याला पाणी आणि आईस पॅड देखील दिले.

IND vs AUS 1st ODI
CWC 2023 Prize money : यंदाचा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघावर लक्ष्मी होणार प्रसन्न; दहा - वीस नाही तर मिळणार इतके कोटी रूपये

शार्दुल ठाकूरसाठी मेडिकल स्टाफची धावाधाव

दरम्यान, भारताचे दोन वेगवान गोलंदाज दमल्यानंतर शार्दुल ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी आला. मात्र त्याची देखील 15 व्या षटकानंतर बॅटरी डाऊन झाली. त्याच्या मदतीला मेडिकल स्टाफ धावत मैदानात आला. मात्र त्यानंतर शार्दुल ठाकूरने आपले षटक सुरू केलं.

भारतीय गोलंदाजांपाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना देखील मोहालीच्या उष्णतेने हैराण केलं. त्यांनी देखील भारतीय गोलंदाज मधे मधे ब्रेक घेत असताना आपले हेलमेट काढून ओल्या टॉवेलने आपली उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करत होते.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com