VIDEO : क्रिकेटच्या देवाचा असाही साधेपणा! सचिन तेंडुलकरनं रस्त्यात थांबून टपरीवर घेतला चहाचा 'आस्वाद' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Master-Blaster Sachin Tendulkar Video Viral

क्रिकेटचा देव आपल्या स्टॉलवर आल्याचं पाहताच चहावाल्याला आश्चर्याचा धक्का बसला.

VIDEO : क्रिकेटच्या देवाचा असाही साधेपणा! सचिन तेंडुलकरनं रस्त्यात थांबून टपरीवर घेतला चहाचा 'आस्वाद'

Master-Blaster Sachin Tendulkar Video Viral : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) साधेपणा आज बेळगाव वासीयांना (Belgaum) पाहायला मिळाला. सचिन तेंडुलरकर त्याच्या मुलासोबत गोव्याला निघाला होता. याचदरम्यान त्यानं बेळगाव इथं एका ठिकाणी रस्त्याकडं असलेल्या एका चहाच्या (Tea) टपरीवर चहाचा आस्वाद घेतला.

हा पूर्ण व्हिडिओ सचिननं सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. टपरीच्या मालकासोबत सेल्फी काढत टीपही दिली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सगळ्यांचा लाडका आहे. सचिनं अनेकवेळा प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल. कधी चंद्रपुरातील ताडोबा असो की, कोल्हापूरमधील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (Shree Nrusinghwadi) इथं दिलेली श्री दत्त दर्शनासाठीची भेट.

हेही वाचा: 'सुषमा अंधारेंच्या नादाला लागू नका, अन्यथा कुंभारावानी चिखलासारखं तुडवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही'

मात्र, सचिनच्या प्रवासाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सचिन आपल्या मुलासोबत प्रवास करत आहे. यावेळी त्यानं प्रवासात अर्जुनला चहा विचारला. त्यावेळी मुलाची आलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय आहे. सचिन तेंडुलकर आपल्या कारनं लाँगड्राईव्ह करत होता. प्रवास करताना आपला थकवा घालविण्यासाठी त्यानं चहा घेणं पसंत केलं. मात्र, त्यानं चहा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये घेतला नाही तर रस्त्याकडील एका टपरीमध्ये घेतला.

हेही वाचा: मोठी बातमी! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राचा माजी मंत्री जखमी; डोळा, डोक्याला दुखापत

याचा व्हिडिओ खुद्द सचिननं सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडिओच्या कॅप्शन आणि हॅशटॅगवरून तो एकतर मुंबईहून गोव्याला जात होता किंवा गोव्याहून मुंबईला येत होता, हे कळतंय. या व्हिडिओ क्लिपला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केलं आहे. या व्हिडिओची सुरुवात सचिन एका चहाच्या स्टॉलला भेट देताना दिसतोय. एक कप चहा आणि सोबत टोस घेतला. तो चहाचा आस्वाद घेत आहे. त्याचवेळी मुलाची फिरकीही घेतली.

हेही वाचा: Tribal Dance Festival : 10 देशांतील आदिवासी कलाकारांचा सहभाग; महोत्सवात प्राचीन परंपरेचं दर्शन

गाडीत बसलेल्या अर्जुनला इशारा करुन विचारतो, चहा घेणार का? अर्जुन एकदम लाजतो. तो आपला चेहरा गाडीच्या आरशाच्या मागं लपवतो. चहा घेत घेतच तिथं उभ्या असलेल्या चहावाल्या पुतळ्यासोबत तो सेल्फी घेतानाही दिसत आहे. याचदरम्यान सचिनला शाळेत जाणाऱ्या मुलीचीही भेट झाली. यावेळी सचिननं तिची आपुलकीनं चौकशी केली. त्याच्या या व्हिडिओमध्ये तो शाळेचा ड्रेस घातलेल्या आणि खांद्यावर बॅग लटकवलेल्या मुलीला भेटताना दिसत आहे. तो तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतो. मुलीसोबत तिचे पालकही दिसत आहेत. सचिनचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.