Match Fixing Allegations Rock Indian Cricket
esakal
भारतीय क्रिकेटवर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचं सावट बघायला मिळते आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे. याप्रकरणी आसाम क्रिकेटने चार खेळाडूंनी निलंबितही केलं आहे. त्यांच्याविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. आसाम क्रिकेट संघटनेने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.