esakal | द्रविडच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेचा पराभव करण्यास धवनसेना सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid

India tour of Sri Lanka 2021

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेचा पराभव करण्यास धवनसेना सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

India vs Sri Lanka 1st ODI: संघनिवड आणि तब्बल ३३ दिवसांच्या कालावधीनंतर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. भारताच्या दुसऱ्या फळीचा हा संघ असला, तरी श्रीलंकेवर भारी ठरण्याची क्षमता बाळगून आहे.

भारत-श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना १३ तारखेला होणार होता; परंतु श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य इंग्लंड दौऱ्याहून येताच कोरोनाबाधित झाल्यामुळे मालिकेची सुरुवात लांबवण्यात आली. भारताच्या दुसऱ्या फळीचा हा संघ निवडीच्या ३३ दिवसांनंतर खेळणार असला, तरी संघातील खेळाडू ७७ दिवसांनंतर पहिला सामना खेळणार आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर हे खेळाडू प्रथमच सामन्यासाठी मैदानात उतरतील. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली हा संघ 28 जू जून रोजी लोकंबोत दाखल झाला होता.

हेही वाचा: द्राक्षे आंबट होऊ देऊ नका; अमोल कोल्हेंना शिवसेनाचा इशारा

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे.

कुठे पाहाल सामना?

भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळला जाणारा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहू शकणार आहात. सोनी लिव्ह अॅप आणि संकेतस्थळावरही सामना पाहू शकता.

संभाव्य संघ

भारत: पृथ्वी शॉ, शिखर धवन (कर्णधार), सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव.

श्रीलंका : पथुम निसांका, चरिथ असालांका, दसून शनाका (कर्णधार), वानिन्दु हसारंगा, रमेश मेंडीस, धनंजय डिसिल्व्हा किंवा अखिला धनंजया, चमिरा करुणारत्ने, दुषमंथा चमीरा; प्रवीण जयविक्रमा,

loading image