esakal | द्राक्षे आंबट होऊ देऊ नका; अमोल कोल्हेंना शिवसेनाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अमोल कोल्हे.

द्राक्षे आंबट होऊ देऊ नका; अमोल कोल्हेंना शिवसेनाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबईः ‘‘ पुण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडत आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले आहे. तुम्हाला मिळालेली सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका, असा सल्ला शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी दिला.

खासदार कोल्हे यांनी शिरूर येथे केलेल्या वक्तव्याचा कान्हेरे यांनी समाचार घेतला. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे? कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली आहे. तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी-कधी स्मरणशक्ती विसरतात तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले. आपण ज्या उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले असा टोलाही कान्हेरे यांनी लगावला.

हेही वाचा: ‘मी मारल्यासारखे करतो, तू लागल्यासारखे कर’; ठाकरे सरकारवर टीका

मुख्यमंत्र्यांवर शरद पवार यांचा वरदहस्त असल्याचे लक्षात ठेवा

‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने सुरू केलेले शिवसंपर्क अभियान हे पक्षवाढीसाठी नसून, फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकासआघाडी राहिली नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्यांच्यावर शरद पवार यांचा वरदहस्त आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे,’’ अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शिवसैनिकांना सुनावले. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव व खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १७) करण्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यापूर्वीच शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी आढळराव पाटील यांनी या कामाचे उद्‍घाटन केले. त्यावेळी त्यांनी व उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. कोल्हे व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली.

loading image