
Jasprit Bumrah: आता बुमराहशिवाय खेळण्याची तयारी करा... माजी क्रिकेटपटूने स्पष्टच सांगितलं
Jasprit Bumrah Aakash Chopra : भारतीय संघाने आता जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची सवय लावली पाहिजे, असे माजी क्रिकेटपटूचे मत आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बुमराहला वगळण्यात आले तेव्हा त्याने हे विधान केले.
बुमराहचा श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेतील संघात समावेश नव्हता. भारतीय निवड समितीने त्याला तंदुरुस्त घोषित केल्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याचा या मालिकेत समावेश केला. मात्र पहिल्या वनडेच्या एक दिवस आधी त्याला पुन्हा दार दाखवण्यात आले.
हेही वाचा: IND vs SL: इशान अन् सूर्या पुन्हा राखीवच! गोलंदाजी 'ही' भारतासाठी डोकेदुखी
भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने जसप्रीत बुमराहच्या ODI संघातून बाहेर पडण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. चोप्रा म्हणाले, 'मला या गोष्टीची थोडी अडचण आहे की बुमराहने सप्टेंबरपासून एकही वनडे खेळलेला नाही. मला वाटते की बुमराहशिवाय आपल्या सर्वांनी सामन्यांची तयारी करण्याची वेळ आली आहे. तो मध्यंतरी एक सामना खेळला आणि त्यानंतर त्याला दुखापत झाली. तो बराच वेळ बाहेर होता. त्याला पुन्हा बोलावून पुन्हा हाकलून दिले.
हेही वाचा: Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचा उत्साह शिगेला! जगताप-सरनौबतमध्ये ८६ किलोच्या विजेतेपदासाठी लढत
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, 'जसप्रीत बुमराहचे नाव संघात समाविष्ट केले जाते आणि नंतर त्याला वगळले जाते. या वर्षी एकदिवसीय विश्वचषकही होणार असल्याने ही गोष्ट चांगली नाही. गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकातही हेच पाहायला मिळाले होते. आपल्या सर्वांना माहित आहे की बुमराहसारखा कोणीही नाही आणि कधीही होणार नाही, परंतु यावेळीची कामगिरी पाहता मोहम्मद सिराज चांगली गोलंदाजी करत आहे. त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचा दर्जा उंचावला आहे ते कौतुकास्पद आहे.
हेही वाचा: Ruturaj Gaikwad: तब्बल २४ चौकार अन् ८ षटकार! मात्र ऋतुराजचे द्विशतक पाच धावांनी हुकले
उमरान मलिकही चांगली कामगिरी करत आहे आणि मोहम्मद शमीनेही वनडेत प्रभावी कामगिरी केली आहे. अर्शदीप सिंगही तयार आहे, मलाही प्रसिद्ध कृष्णाच्या दुखापतीबद्दल काहीच माहिती नाही, पण तोही आधीच ठीक दिसत आहे.