
मेलबर्न क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केला आहे. यात सीमारेषेवर झेल पकडण्याशी संबंधित नियमाचा समावेश आहे. या नियमानुसार आता सीमारेषेवर 'बनी हॉप' अवैध मानला जाईल. एखादा खेळाडू सीमारेषेबाहेर गेलेला चेंडू हवेत उडी मारून आत फेकतो आणि झेल घेतो त्याला बनी हॉप म्हटलं जातं. आता सीमारेषेच्या आत राहूनच चेंडू पकडणं वैध मानलं जाईल. आयसीसीच्या प्लेइंग कंडिशनमध्ये याच महिन्यात हा बदल होईल. तर ऑक्टोबर २०२६ मध्ये एमसीसीमध्ये बदल होईल.