MCC Introduces New Cricket Laws
esakal
The MCC has announced 73 changes to the Laws of Cricket : मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियमांत छोटे-मोठे असे ७३ बदल केले आहेत. ऑक्टोबरपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. नव्या नियमानुसार, दोन किंवा अधिक दिवसांच्या सामन्यात अखेरच्या षटकात फलंदाज बाद झाला की खेळ तेथेच थांबवला जायचा, पण आता तसे होणार नाही. हे षटक पूर्ण केले जाणार आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने दिवसाच्या अखेरच्या षटकात विकेट घेतली, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला नवा फलंदाज पाठवावा लागत नाही, हे अन्यायकारक असल्याचे वाटले, असे एमसीसीने या बदलाचे स्पष्टीकरण दिले आहे.