Yamini Mourya wins Commonwealth Games 2026 Judo Gold
esakal
Yamini Mourya wins Commonwealth Games 2026 Judo Gold: भारतीय ज्युदोपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शुक्रवारचा दिवस गाजवला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताला एकदाही ज्युदोमध्ये सुवर्णपदक जिंकता आले नव्हते आणि आज एकमागून एक असे दोन सुवर्णपदक आले. अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांच्यानंतर यामिनी मौर्य हिने सुवर्णपदकासाठी जोर लावला, परंतु तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. राष्ट्रकुलमध्ये ज्युदोत सुवर्ण जिंकून देणारी अस्मिता ही पहिली महिला व भारतीय खेळाडू ठरली. पुरुष खेळाडूचा हा मान हर्षने पटकावला. अस्मितानंयर मध्यप्रदेशच्या यामिनीने पदक जिंकून इतिहास घडवला.