

Men's & Women's Hockey World Cup 2026
Sakal
Men's & Women's Hockey World Cup Marathi News: नुकताच फिफा वर्ल्ड कप आणि राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर आता क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे. यंदा नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे पुरुष आणि महिला हॉकी वर्ल्ड कप खेळला जाणार आहे.
१५ दिवस चालणाऱ्या स्पर्धेला १५ ऑगस्टपासून म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य दिनापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तसेच २९ ऑगस्टला महिलांचा, तर ३० ऑगस्टला पुरुषांचा अंतिम सामना खेळला जाईल.
ही स्पर्धा ॲमस्टेलवीनमधील वॅजेनर हॉकी स्टेडियम आणि वावरे येथील नव्याने बांधलेले बेल्फियस हॉकी मैदान येथे पार पडणार आहे. एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून यंदाचे स्पर्धेते स्वरुपही नवीन आहे. पारंपारिक उपांत्यपूर्व फेरीच्या जागी सेकंड ग्रुप स्टेज अशी फेरी घेण्यात येणार आहे, याचा अर्थ बाद फेरीच्या सामन्यांपूर्वी प्रत्येक संघ किमान पाच सामने खेळेल.