

Mamata Banerjee Apologises Over Messi Event Chaos
Esakal
लियोनेल मेस्सी भारत दौऱ्यावर असून तो कोलकात्यात पोहोचण्याआधीच फुटबॉल प्रेमीमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. शनिवारी जेव्हा मेस्सी भारतात पोहोचला तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मोठी गर्दी केली होती. मेस्सी मैदानात येताच मात्र मोठा गोंधळ सुरू झाला. लोकांनी बॉटल्स फेकायला सुरुवात केली. काही ठिकाणी लोक खुर्चीवर उभा राहिले. यानंतर चाहत्यांमध्ये मारहाणही झाली आणि तोडफोडीचे प्रकार घडले.