

FIFA World Cup 2026
esakal
मुंबई : गतविजेता अर्जेंटिना आणि लढाऊ इजिप्त यांच्यातील चुरशीच्या सामन्याने, तसेच या स्पर्धेत आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करणाऱ्या कोलंबिया विरुद्ध स्वित्झर्लंड या सामन्याने फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीचा थरार संपणार आहे. बाद फेरीचे सामने अनेकदा छोट्या-छोट्या रणनीतिक गोष्टींवर ठरतात.
त्यामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये शिस्त, बचाव फळीचे संघटन आणि ऐनवेळचे निर्णय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा आणि एफसी गोवाचा डिफेंडर तसेच 'झी ५' चा तज्ज्ञ संदेश झिंगन याने व्यक्त केले आहे.