
स्टार फुटबॉलपटू ओझिलने भारतातील मुस्लीमांसाठी केली प्रार्थना, झाला ट्रोल
नवी दिल्ली : जगविख्यात फुटबॉलपटू (Football Player) मेसुत ओझिल (Mesut Ozil) याने भारतात अल्पसंख्यांकाविरूद्ध मानवाधिकाराचे (Human Rights) उल्लघन होत आहे असा दावा करत भारतातील मुस्लीमांच्या संरक्षणासाठी (Indian Muslim Security) प्रार्थना केली. जर्मनीच्या या स्टार फुटबॉलरने #BreakTheSilence हा हॅशटॅग वापरून ट्विट केले. त्याने जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला. यावरून सोशल मीडियावर अनेकांनी ओझिलला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा: हार्दिकनं शेअर केलं ड्रेसिंग रुमचं भन्नाट सिक्रेट, 'देव आमची...'
रियल माद्रिदकडून खेळलेल्या मेसुत ओझिलने ट्विट केले की, 'भारतात आमच्या मुस्लीम बंधू आणि भनिनींच्या सुरक्षा आणि उन्नतीसाठी लैलत अल - कद्रच्या पवित्र रात्री मी प्रार्थना करत आहे. या सर्वांनी मिळून या लज्जास्पद परिस्थितीबद्दल जनजाग्रुती करूयात. जगभरातील कथाकथित सर्वात मोठ्या लोकशाही देशात मानवाधिकारांच्या बाबतीत हे काय होत आहे. #BreakTheSilence'
हेही वाचा: उमरान नावाचं वादळ येतंय; काँग्रेस नेता झाला क्रिकेटरचा फॅन
या ट्विटनंतर लोक ओझिलला ट्रोल (Mesut Ozil Trolled) करू लागले आहेत. यानंतर ओझिलने चीनमधील मुस्लीमांच्या स्थितीबाबतही ट्विट केले. काही लोकांनी ओझिलच्या या ट्विटवर त्याची प्रशंसा केली आहे तर काहींनी अनेक व्हिडिओ आणि तथ्य समोर आणत ओझिलवर निशाना साधला. काही लोकांनी तर पाकिस्तानमधील व्हिडिओ ट्विट करून पाकिस्तानात काय होत आहे हेही पाहा असे सुनावले. मुळचा तुर्की / कुर्द असलेला ओझिल जर्मनीच्या राष्ट्रीय संघाकडून खेळतो. ओझिलचे वडील हे तुर्कस्तानशी संबंधित आहेत. त्याची पत्नी एमीन देखील तुर्कीश आहे.
Web Title: Mesut Ozil Tweet About Indian Muslim Human Rights Pray For Them Get Trolled
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..