esakal | "पंतप्रधानांच्या विरोधात बोलल्यामुळेच जॉब गमावला"
sakal

बोलून बातमी शोधा

"पंतप्रधानांच्या विरोधात बोलल्यामुळेच जॉब गमावला"

"पंतप्रधानांच्या विरोधात बोलल्यामुळेच जॉब गमावला"

sakal_logo
By
सुशांत जाधव

कॉमेंट्री पॅनलमधून हाकलपट्टी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन समालोचक मायकल स्लेटर यांना आपली चूक कळली आहे. पण त्यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिलाय. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांच्याविरोधात केलेले विधान अयोग्य होते. भर व्यासपीठावर असे बोलायला नको होते, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान मॉरिस यांच्या विरोधातील वक्तव्यामुळेत बहुतेक 7 क्रिकेट ब्रॉडकास्‍टने कॉमेंट्री पॅनलधून काढून टाकले, असेही स्लेटर यांनी म्हटले आहे.

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात कोरोनामुळे स्पर्धा स्थगित झाली. आस्ट्रेलियात प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची गोची झाली. खेळाडूंसोबत मायकल स्लेटरही अडकून पडले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मॉरिसन यांच्यावर टीका केली होती. कुणाचे काही बरे वाईट झाले तर त्याला पंतप्रधानांच जबाबदार असतील. ते देशातील नागरिकांच्या जीवावर उठले आहेत, असा आरोप ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरने केला होता.

हेही वाचा: विराटने RCBसाठी ट्रॉफी न जिंकणं म्हणजे... - सुनील गावसकर

'द संडे टेलीग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावर मायकल स्लेटर म्हणाले की, मला पंतप्रधानांचा अपमान करायचा नव्हता. त्यावेळी मी खूप भावनिक होता. सार्वजनिकरित्या पंतप्रधानांविषयी असे बोलणे योग्य नाही. पण याची माफी मागणार नाही. परिस्थितीनुसार माझ्याकडून ते वाक्य निघाले. जर विचारपूर्वक बोललो असतो तर आज कॉमेंट्री पॅनलमधून आउट झालो नसतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: KL राहुल प्रितीला अलविदा करणार? काव्या मारन मोठी बोली लावणार

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात कोरोनाचा शिरकावामुळे भारतात रंगलेली स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तात्काल मायदेशी परतण्याचे दरवाजे बंद होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयावर मायकल स्लेटर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. सरकारला आमची काळजी असती तर त्यांनी आम्हाला मायदेशी परतण्याची परवानगी दिली असती. ही गोष्ट लाजीरवाणी आहे. पंतप्रधान आमच्या जीवावर उठले आहेत. अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. आयपीएलमध्ये सहभागी होताना सरकारची परवानगी घेतली होती. आता ही स्पर्धा अडचणीत सापडल्यानंतर आमच्या सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडल्याचे त्यांनी म्हटले होते.

loading image
go to top