esakal | IPL 2021: विराटने RCBसाठी ट्रॉफी न जिंकणं म्हणजे... - सुनील गावसकर
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Gavaskar

वाचा विराटच्या नेतृत्वशैलीबाबत काय म्हणाले गावसकर...

विराटने RCBसाठी ट्रॉफी न जिंकणं म्हणजे... - सुनील गावसकर

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Eliminator: विराट कोहलीच्या RCB संघाला कोलकाता संघाकडून पराभूत व्हावे लागले. RCB चा कर्णधार म्हणून हा विराटचा शेवटचा सामना ठरला. विराटने या सामन्यात फारशी चांगली कामगिरी केली नाही. विराटच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १३८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने शेवटच्या षटकात १३९ धावा केल्या. विराटची RCBचा कर्णधार म्हणून कारकीर्द संपुष्टात आली. त्याला ट्रॉफी जिंकता आली नाही. त्याबद्दल लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: Video : विराट कॅप्टन्सीचा शेवट पराभवासह पंचासोबतच्या वादानं

Virat Kohli

Virat Kohli

"विराटच्या RCB चा पराभव होणं आणि विराटने कर्णधार म्हणून IPL चे विजेतेपद न मिळवणं ही बाब दु:खद आहे. प्रत्येकाला आपल्या कारकिर्दीचा शेवट विजेतेपदाने करावासा वाटत असतो. विराटलादेखील आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा शेवट IPLची ट्रॉफी उंचावून करावा असं वाटलं असणार. पण खेळाडूला किंवा फॅन्सला जे हवं त्याप्रमाणे सारं काही घडतं असं नाही. डॉन ब्रॅडमन यांच्या बाबतीत काय घडलं ते आपण पाहिलं. त्यांना धावांची सरासरी १०० राखण्यासाठी शेवटच्या डावात केवळ ४ धावा हव्या होत्या, पण ते शून्यावर बाद झाले. सचिनने २०० कसोटी सामने पूर्ण केले, पण शेवटच्या सामन्यात त्याला ७९ धावांवर बाद व्हावं लागलं. शतकाने त्याला हुलकावणी दिली", अशा उदाहरणांसह गावसकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: RCBचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला

"आपल्या हवं तसं प्रत्येक वेळी घडेलच असं नाही. शेवटचा सामना दमदार कामगिरीसाठी लक्षात राहावा असं सगळ्यांचं भाग्य नसतं. पण असं असलं तरी विराटने RCB साठी काय काय केलंय हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्याची कामगिरी कोणीच नाकारणार नाही. RCB कडून खेळताना एका वर्षी त्याने चक्क ९७३ धावा केल्या होत्या. एका हंगामात हजार धावा करण्यासाठी तो केवळ २७ धावांनी कमी पडला. असं खूप कमी वेळा होतं. RCB साठी त्याने खरंच खूप काही केलं आहे. RCB ला ब्रँड म्हणून एका वेगळ्याच उंचीवर तो घेऊन गेला आहे. त्याला RCB चा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकता आली नाही याची साऱ्यांनाच खंत राहिल", असं गावसकर म्हणाले.

loading image
go to top