वर्णद्वेषाविरोधासाठी 'हा' खेळाडू 755 कोटी रुपये करणार आहे दान... कोण आहे 'तो' दानशूर...?

Michael Jordan came running for help against racism
Michael Jordan came running for help against racism

सामाजिक बहिष्कार हा कोणत्याही रोगापेक्षा भयानक आहे, कोरोना संसर्गाच्या निमित्ताने मानव जातीला अनुभवास मिळत आहे. आतापर्यंत अनेक रोग आले आणि माणसाने विज्ञानाच्या आविष्काराच्या जोरावर त्याच्यावर मात केली. भविष्यात कोरोनावरही मात करण्यात माणसाला यश मिळेल; पण वर्णद्वेष आणि जातीपातीवर विजय मिळवण्यास मात्र विज्ञानाला कधीच यश मिळणार नाही. कारण विज्ञान हे शेवटी माणसाच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चालत असते. माणूस त्याचा कसा वापर करतो, यावरच विज्ञानाची उपयोगीता ठरते.

मायकल जॉर्डन मदतीसाठी आला धावून

अमेरिकेतील वर्णद्वेषी भडक्‍याने अनेकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम भोगावे लागले. एकाला तर आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर अनेकजण मदतीसाठी पुढे सरसावले. यात आंतरराष्ट्रीय बॉस्केटबॉल स्टार मायकल जॉर्डन अग्रभागी आहे. मायकल जॉर्डनने सामाजिक न्याय आणि वर्णद्वेषाविरोधात लढणाऱ्या संघटनांना 100 दशलक्ष डॉलरचे (सुमारे 755 कोटी रुपये) दान देणार आहे. मायकल येत्या दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने हे दान देणार आहे. तो दान करत असलेली रक्कम ही फेसबुक आणि ऍमेझाॅन देत असलेल्या रकमेपेक्षा दहापट आहे. या दोन कंपन्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना 10 दक्षलक्ष डॉलरचे (सुमारे 75 कोटी) दान देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत नुकतेच कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लाईड याची हत्या झाली. त्यानंतर आंदोलने आणि निषेधाने अमेरिका देश ढवळून गेला. नेमक्‍या याच वेळी मायकल जॉर्डन मदतीसाठी धावून आला.

दरम्यान, जॉर्ज फ्लाईडच्या हत्येचा मायकल जॉर्डनने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. माझ्या भावना फ्लाईडचे कुटुंबीय आणि आतापर्यंत वर्णद्वेषामुळे जीव गमावाव्या लागलेल्या माझ्या तमाम समाज बांधवांसोबत आहेत. आता खूपच झाले, वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवलाच पाहिजे, ज्यामुळे आमच्या राजकीय नेत्यांना कायद्यामध्ये बदल करावाच लागेल, असेही मायकल जॉर्डन ठामपणे सांगत आहे.

कृष्णवर्णीय असणे गुन्हा की काय ?

कृष्णवर्णीय असणे, हा अमेरिकेत गुन्हाच ठरत आहे की काय, अशी स्थिती आहे आणि त्याची किंमत संपूर्ण समुदायाला चुकवावी लागत आहे. जोपर्यंत आमच्या देशातील वर्णभेद दूर होत नाहीत, तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार असून, जोपर्यंत आम्हाला सामाजिक न्याय आणि सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचेही मायकल जॉर्डनने म्हटले आहे.

त्यांच्या जीवनात बदल घडवावा लागेल.
ब्रॉंड जॉर्डनचे प्रमुख क्रेग विलियम्स यांच्या म्हणण्यानुसार, कृष्णवर्णीय समुदायात परिवर्तन करण्यासाठी अजून बरेच काम करण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनात बदल घडविणे, हे आमचे ध्येय आहे, त्याची जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागेल.

'हॉल ऑल फेम' जॉर्डन

मायकल जॉर्डन सहा वेळा अमेरिकन नॅशनल बॉस्केटबॉल चॅम्पियन ठरलेल्या संघाचा सदस्य आहे. 90 च्या दशकाच्या सुरवातील जॉर्डन यांनी शिकागो बुल्स बॉस्केटबॉल संघातून पदार्पण केले होते. त्यांचा 'हॉल ऑफ फेम'मध्येही समावेश आहे. सध्या तो शर्लोट हॉरनेट्‌स या बॉस्केटबॉल संघाचा मालक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com