esakal | वॉन म्हणतो, जुन्या ट्विटचा हास्यास्पद खेळ बंद करा!
sakal

बोलून बातमी शोधा

michael vaughan

वॉन म्हणतो, जुन्या ट्विटचा हास्यास्पद खेळ बंद करा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आपल्या क्रिकेटर्सच्या सोशल मीडियावरील ट्विटची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. वर्णभेदीच्या टिप्पणीवरुन इंग्लंडकडून पदार्पणाच्या सामन्यातच ओली रॉबिन्सनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर वर्णभेदावर टिप्पणीच्या जुन्या प्रकरणात अनेक क्रिकेटर्स अडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली. इंग्लंड आणि वेल्स बोर्डाचा चौकशीचा खेळ हास्यास्पद आहे, अशी टीका इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकल वॉन याने केलीय. क्रिकेटर्सच्या जुन्या ट्विटची चौकशी करणे बंद करा, असेही त्याने बोर्डाला सुनावले आहे. (michael vaughan on investigation of alleged racial tweet this is ridiculous)

इंग्लंडचा मर्यादित षटकातील कर्णधार इयॉन मॉर्गन, विकेट किपर फलंदाज जोस बटलर यांनी भारतीयांची थट्टा केल्यासंदर्भातील जुन्या ट्विटचा विषय सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला होता. यासंदर्भात चौकशी सुरु आहे, असे ईसीबीने म्हटले होते. खेळाडूंच्या जुन्या ट्विटची चौकशी करणे हस्यास्पद आहे, असा टोला वॉनने लगावलाय.

हेही वाचा: अँडरसनने 'सर' केला कूकचा विक्रम, कुंबळेंनाही टाकणार मागे

वॉनने यासंदर्भात ट्विट करताना लिहिलंय की, मॉर्गन, बटलर आणि अँडरसन यांनी ज्यावेळी ट्विट केले होते त्यावेळी त्यावर कोणीही आक्षेप घेतला नव्हता. काही वर्षानंतर ते ट्विट आक्षेपार्ह कसे वाटते. ईसीबीने तपासाचा सुरु केलेला खेळ बंद करावा, अशी मागणीही वॉने आपल्या ट्विटच्या माध्यमातून केलीये.

हेही वाचा: WTC साठी न्यूझीलंडचा प्लॅन, मुंबईत जन्मलेल्या खेळाडूला संधी

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ओली रॉबिन्सनने इंग्लंडकडून पदार्पण केले. दमदार कामगिरीनंतरही त्याच्या खेळापेक्षा त्याने 2012-13 मध्ये केलेल्या वर्णभेदाच्या टिप्पणीवरुन तो चर्चेत आला. सोशल मीडियावर त्याने केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा रंगल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केले होते. याप्रकरणानंतर क्रीडा जगतात वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.