Mirabai Chanu
esakal
टोकियो ऑलिंपिकमध्ये ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या भारतीय महिला वेटलिफ्टर खेळाडू मीराबाई चानू हिला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून नव्या वजनी गटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यानुसार आता महिला विभागात ५३ किलो वजनी गटापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे मीराबाई चानू हिला आता ४९ किलो वजनी गटात सहभागी होता येणार नाही.