IND vs AUS : ऑस्ट्रेलियाही दुखापतींनी त्रस्त! मार्श, स्टार्क अन् स्टॉयनिसची माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mitchell Starc Mitchell Marsh and Marcus Stoinis Will Miss T20I Series Against India

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाही दुखापतींनी त्रस्त! मार्श, स्टार्क अन् स्टॉयनिसची माघार

Australia Tour Of India T20I Series : टी 20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ तीन टी 20 सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे. ही मालिका 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाला दुखापतींचा फटका बसला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श (Mitchell Marsh), मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यांनी भारत दौऱ्यातून माघार घेतली. स्टार्कच्या घोट्याला दुखापत झाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया डॉट एयूने दिलेल्या माहितीनुसार दुखापत फारशी गंभीर नाही. मात्र वर्ल्डकपच्या तोंडावर संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.

हेही वाचा: Shahid Afridi: विराटला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या आफ्रिदीची अमित मिश्राने केली बोलती बंद

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यासाठी यापूर्वीच डेव्हिड वॉर्नरला विश्रांती देण्यात आली आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीने नॅथन एलिस, डेनियल सॅम्स आणि सेअन अॅबोट यांची स्टार्क, मार्श आणि स्टॉयनिस यांची रिप्लेसमेंट म्हणून निवड केली आहे. मार्श आणि स्टॉयनिस यांना झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेत दुखापत झाली होती. तर स्टार्कच्या घोट्याचा बुधवारी स्कॅन करण्यात आला त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

हेही वाचा: T20 World Cup : टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं खरं कारण आले समोर, BCCI ची चिंता वाढली

ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबरला मोहालीत, दुसरा सामना 23 सप्टेंबरला नागपूर तर तिसरा सामना 25 सप्टेंबरला हैदराबाद येथे होणार आहे. भारतातील हा आटोपशीर दौरा झाल्यानंतर टी 20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यावरूद्ध देखील टी 20 मालिका खेळणार आहे.

Web Title: Mitchell Starc Mitchell Marsh And Marcus Stoinis Will Miss T20i Series Against India Due To Injury

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..