चारशे मीटर शर्यतीत महम्मद अनसचा राष्ट्रीय विक्रम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

नवी दिल्ली- आशियाई विजेत्या महम्मद अनसने झेक प्रजाकसत्ताक येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत 45.24 सेकंदांचा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. याच स्पर्धेत महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत भारताच्या आर. पुवम्माने सुवर्णपदक जिंकले. दोन दिवसापूर्वी त्याने झेकमधील ताबोर येथील स्पर्धेत 45.35 सेकंद अशी वेळ नोंदविली होती. 

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चौथे स्थान मिळविताना अनसने 45.31 सेकंदांचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता. त्यापूर्वीचा 45.32 सेकंदाचा विक्रम अनसच्याच नावावर होता. गेल्यावर्षी दिल्ली येथे झालेल्या इंडियन ग्रॅंडप्रिक्‍स स्पर्धेत त्याने तो विक्रम नोंदविला होता. त्याआधी त्याने 45.40 सेकंद आणि 45.45 सेकंद असे दोन विक्रम केले होते. भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत त्याने 42 वर्षांनंतर भारताला चारशे मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. आजची त्याची कामगिरी आशियाई क्रमवारीत आठव्या स्थानावर असून प्रथम सहा क्रमांकावर कतारच्या अब्देला हारुणच्या वेळा आहेत. सातव्या क्रमांकावर कतारच्याच महम्मद अब्बासने दिलेली वेळ आहे. 

पुवम्माने 53.01 सेकंद वेळ देत सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या दोनशे मीटर शर्यतीत चारशे मीटरमधील माजी राष्ट्रीय विक्रमवीर आरोक्‍य राजीवने 20.77 सेकंद वेळ देत ब्रॉंझपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी भारताचे अनेक ऍथलिट सध्या परदेशात प्रशिक्षण घेत आहेत.

Web Title: mohammad anas 400 meter race

टॅग्स