
BCCI च्या निर्णयामुळे भविष्यातील 'अशा' घटनांना चाप बसेल : अजहरूद्दीन
भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) आज वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) प्रकरणात धमकी दिलेला पत्रकार बोरिया मुजूंमदार (Boria Majumdar) यांच्यावर दोन वर्षाची बंदी घातली. त्यांच्यावर नोंदणीकृत खेळाडूंच्या मुलाखती घेणे आणि देशाच्या स्टेडियममध्ये प्रवेश यावर दोन वर्षाची बंदी (Ban) घालण्यात आली आहे. त्यांना दोन वर्षासाठी मीडिया अॅक्रिडियेशन देण्यात येणार नाही. याबाबतची माहिती बीसीसीआयने आपल्या राज्य संघटनांना पत्रकाद्वारे दिली. साहाने मुजूंमदार यांना मुलाखत देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मुजूंमदार यांनी धमकी देणारे संदेश साहाला पाठवले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने 25 फेब्रुवारीला तीन सदस्यांची एक समिती स्थापन केली होती.
हेही वाचा: CSK vs RCB : 'चेन्नईला कसं कम बॅक करायचं हे चांगलंच कळतं'
दरम्यान, बीसीसीआयने पत्रकारावर कारवाई केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीनने (Mohammad Azharuddin) आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट करून साहा प्रकरणातील कारवाईची स्तुती केली. अझरूद्दीनने ट्विट केले की, 'बीसीसीआयने योग्य निर्णय घेतला. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टींना आळा बसण्यास खूप मदत होणार आहे.'
हेही वाचा: केन विल्यमसनची इंग्लंड दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघात वापसी
ज्यावेळी हे प्रकरण उजेडात आले होते त्यावेळी वृद्धीमान साहाने या पत्रकाराचे नाव उघड करण्यास नकार दिला होता. मात्र ज्यावेळी या प्रकरणी तीन सदस्यांची समिती स्थापन झाली त्यावेळी त्यांच्यासमोर साहाने बोरिया मुजूंमदार यांचे नाव घेतले. या तीन सदस्यीय समितीत बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे खजीनदार अरुण सिंह धुमल आणि बीसीसीआय काऊन्सीलचे सदस्य प्रभतेज सिंह भाटिया यांचा समावेश होता.
Web Title: Mohammad Azharuddin Reacts Bcci Decision Of Ban Boria Majumdar In Wriddhiman Saha Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..