

17th Shivaji Park Gymkhana Carrom Tournament
Sakal
शिवाजी पार्क जिमखाना आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने १७ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या गटाचे मुंबईच्या महम्मद घुफ्रानने विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात त्याने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला २५-१४, २५-० असे सरळ आणि सहज दोन सेटमध्ये हरवले. अंतिम फेरीच्या या सामन्यात घुफ्रानने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली होती.