PSL 2022 Final : दमादम मस्त 'कलंदर्स' लाहोरचा पहिला नंबर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Multan Sultans vs Lahore Qalandars, PSL Final

PSL 2022 Final : दमादम मस्त 'कलंदर्स' लाहोरचा पहिला नंबर...

Multan Sultans vs Lahore Qalandars, PSL Final : मोहम्मद हाफिझनं केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर शाहिन शाह आफ्रिदीच्या लाहोर कलंदर्सं संघान (Lahore Qalandars ) पीएसएलच्या ट्रॉफीवर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. लाहोरच्या गदाफी स्टेडियमवर रंगलेल्या फायनल सामन्यात कलंदर्स संघाने मुल्तान सुल्तान्स संघाला 42 धावांनी पराभूत केले. कलंदर्सचा कर्णधार शाहिन शाह आफ्रीदी (Shaheen Afridi) याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा स्टार फलंदाज फखर झमान (Shaheen Afridi) अवघ्या 3 धावांची भर घालून तंबूत परतला. अब्दुल्लाह शफिकलाही फार काळ मैदानात तग धरता आला नाही. तो संघाच्या धावसंख्येत 14 धावांची भर घालून तंबूत परतला. झीशान 7 (5) आणि कमरान गुलाम 15(20) स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कलंदर्स संघाची अवस्था 4 बाद 79 अशी झाली होती.

मोहम्मद हाफिझनं (Mohammad Hafeez)सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक (Harry Brook)च्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. त्याने 46 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार खेचत 69 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. अखेरच्या तीन षटकात ब्रुकनं नामीबीयाच्या विस्लेच्या (David Wiese) साथीनं 16 चेंडूत 43 डावा कुटल्या. ब्कुक्सच्या 41 (22) आणि विस्लेनं 28(8) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर लाहोर कलंदर्सने निर्धारित 20 षटकात 5 बाद 180 धावा करत मुल्तान सुल्तान्स संघासमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

हेही वाचा: मॅच बघायला गेली तिथं खेळाडूंचा राडा; सारा तेंडुलकरनं शेअर केली स्टोरी

या धावांचा पाठलाग करताना मुल्तान सुल्तान्स (Multan Sultans) संघाची अवस्थाही बिकट झाली. अवघ्या 63 डावात त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला. कर्णधार आणि सध्याच्या घडीला टी-20 क्रिकेटमध्ये धावांची बरसात करणारा मोहम्मद रिझवान 14 धावांवर बाद झाला. सेनापती स्वस्तात आटोपल्यानंतर मुल्तान सुल्तान्स संघाला सावरता आले नाही. खुशदील शाहच्या 32 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. कलदर्सचा कर्णधार शाहिन शाह आफ्रिदीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत अर्धशतक करणाऱ्या मोहम्मद हाफिझनं 4 षटकात 23 धावा खर्च करुन दोन विकेट्स घेतल्या. यादोघांशिवाय झमान खान 2,हॅरिस रौफ आणि विस्ले यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. शान मसूदला फखर झमान याने रन आउट केलं. परिणामी मुल्तान सुल्तान्स संघ अवघ्या 138 धावांत ऑल आउट झाला.

हेही वाचा: VIDEO : संजू चुकला अन् हिटमॅन पुन्हा बनला अँग्री मॅन!

पाकिस्तान प्रिमीयर लीगची (Pakistan Super League) सुरुवात ही 2016 पासून झाली. पहिल्या हंगामात इस्लामाबाद युनायटेडनं टॉफी उंचावली होती. 2017 चा हंगाम हा पेशावर झाल्मी, 2018 इस्लामाबाद युनायटेड, 2019 क्वीटा ग्लाडिएटर्स, 2020 कराची किंग्ज आणि गत हगांमात म्हणजे 2021 मध्ये मुल्तान सुल्तान्स संघाने ही स्पर्धा जिंकली होती. या यादीत आता नवा संघ सामील झाला आहे. लाहोर कलंदर्सने पहिली वहिली टॉफी जिंकली आहे.

Web Title: Mohammad Hafeez Shines With Bat And Ball Lahore Qalandars Beat Multan Sultans And Lift Psl Trophy 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top