मॅच बघायला गेली तिथं खेळाडूंचा राडा; सारा तेंडुलकरनं शेअर केली स्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Tendulkar

मॅच बघायला गेली तिथं खेळाडूंचा राडा; सारा तेंडुलकरनं शेअर केली स्टोरी

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा लंडनला रवाना झालीये. याठिकाणी पोहचताच तिने आपल्या मित्र मैत्रीणींसोबत हॉकी सामना पाहण्याचा आनंद घेतला. यासाठी तिने लंडनच्या स्टेडियमवर हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. आपल्या मित्र मैत्रीणींसोबत आनंदाचे क्षण घालवताना तिने दोन्ही संघातील खेळाडूंच्यातील वादही अनुभवला.

सारा तेंडुलकरने आपल्या इन्ट्राग्राम अकाउंटवरुन हॉकी स्टेडियमवरील मॅचची स्टोरी शेअर केलीये. विशेष म्हणजे सारा जी मॅच पाहायला गेली होती त्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये राडा झाला. साराने खुद्द यासंदर्भातील माहिती शेअर केलीये. साराने याचा व्हिडिओही इन्टा स्टोरीला ठेवलाय. यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

हेही वाचा: Miss U Kohli... स्टेडियममध्ये तरुणीनं दाखवलं 'विराट'प्रेम

हेही वाचा: VIDEO : संजू चुकला अन् हिटमॅन पुन्हा बनला अँग्री मॅन!

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती वेगवेगळ्या गोष्टी, फोटो आणि व्हिडिओज इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करत असते. याआधी तिने कॉफी मेकिंग एक्सरसाइझचा व्हिडिओ शेअर केला होता. यालाही चांगली पसंती मिळाली होती. सारा तेंडुलकने नुकतेच मॉडेलिंगमध्ये करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण या चर्चेवर कोणतीही प्रतिक्रिया ना साराकडून आली ना कुण्या बॉलिवूड मंडळीनं या चर्चेत रस दाखवला. त्यामुळे या चर्चा अफवा असल्याचेच सिद्ध झाले. साराही शिक्षणासाठी परदेशात आहे. फावल्या वेळेत लंडनमधील अनेक ठिकाणी भटकंती करतानाचे फोटो व्हिडिओज ती शेअर करत असते.

Web Title: Sara Tendulkar Share London Hockey Match Fight Instagram Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top