
Video: भारताची भंबेरी उडवणारा रिझवान कमिन्सच्या यॉर्करपुढे भांबवला
Pakistan vs Australia, 3rd Test: वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा इतिहासात पहिल्यांदा पराभव केला होता. त्यावेळी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) भारताची डोकेदुखी ठरला होता. मात्र पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) मोहम्मद रिझवानला अप्रतिम यॉर्कर (Yorker) टाकत भोपळाही फोडू दिला नाही.
हेही वाचा: Video: पाकवर कांगारूंचा ऐतिहासिक विजय; वॉर्नरने नक्कल करत हसन अलीची जिरवली
तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी चहापानापूर्वी पॅट कमिन्सने पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानला भोपळाही न फोडता माघारी धाडले. पॅट कमिन्सचा चेंडू खेळण्यासाठी मोहम्मद रिझवान क्रीजच्या बाहेर आला. मात्र कमिन्सचा चेंडू असा काही आत आला की रिझवानला काय करावे हेच सुचले नाही. चेंडू थेट रिझवानच्या बुटावर बसला. अंपायरने देखील रिझवानला बाद ठरवले.
हेही वाचा: IPL2022: ड्युप्लेसिसचे धोनीच्या कॅप्टन्सीबाबत मोठे वक्तव्य
रिझवान इतका भांबवला होता की त्याने अंपायरच्या निर्णयावर डीआरएस देखील घेतला नाही. तो थेट पॅव्हेलियनकडे चालू लागला. या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त सेलिब्रेशन केले. कारण रिझवानला कसोटी वाचवण्यासाठी कर्णधार बाबरला साथ द्यायची होती. मात्र रिझवान भोपळाही न फोडता माघारी गेला. कर्णधार बाबर देखील 55 धावांची खेळी करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दुसऱ्या डावात 351 धावांचे टार्गेट दिले होते. मात्र बाबर आझम वगळता पाकच्या इतर फलंदजांनी कांगारूंपुढे नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दुसरा डाव 235 धावात गुंडाळत 115 धावांनी सामना आणि मालिका जिंकली. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा तब्बल 24 वर्षांनी दौरा करत आहे.
Web Title: Mohammad Rizwan Out On Zero On Pat Cummins Yorker In Pakistan Vs Australia 3rd Test
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..