धक्कादायक! टी 20 वर्ल्डकपमध्ये मोहम्मद रिझवानला दिले होते प्रतिबंधित औषध? | Mohammad Rizwan Taking Prohibited Substance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammad Rizwan Taking Prohibited Substance

धक्कादायक! टी 20 वर्ल्डकपमध्ये मोहम्मद रिझवानला दिले होते प्रतिबंधित औषध?

पाकिस्तानचा धडाकेबाज विकेटकिपर बॅट्समन मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) बाबतीत एक खळबळजणक खुलासा समोर आला आहे. यामुळे मोहम्मद रिझवान अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर नजीबुल्लाह सुमरो (Najeebullah Soomro) यांनी खुलासा केला की 2021 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये रिझवानला प्रतिबंधित औषध देण्यात आले होते.

हेही वाचा: MS धोनीचा वयाच्या 40 व्या वर्षी एक आणखी पराक्रम

मोहम्मद रिझवानला टी 20 सेमी फायनलपूर्वी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाले होते. त्याला अती दक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र सेमी फायनलसाठी तो ठणठणीत बरा झाला. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध दमदार अर्धशतक ठोकले.

दरम्यान, ही माहिती उघड झाल्यानंतर मोहम्मद रिझवानवर कारवाई होऊ शकते. गेल्या काही वर्षापासून मोहम्मद रिझवान हा दमदार फॉर्ममध्ये आहे. दरम्यान, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आबिक जावेदने (Aqib Javed) मोहम्मद रिझवानची स्तुती करताना त्याची आणि भारताचा विकेटकिपर ऋषभ पंतची (Rishabh Pant) तुलना केली.

हेही वाचा: किंग कोहलीचा आयपीएल मधला 6 वर्ष जुना रेकॉर्ड 'हा' खेळाडू तोडणार?

एका मुलाखतीत दावेदने रिझवानला पंतपेक्षाही भारी म्हटले. ते म्हणाले होते की पंत हा उत्कृष्ट खेळाडू आहे यात शंका नाही. मात्र रिझवान ज्या प्रकारे जबाबदारीने खेळ करतो त्या तुलनेत पंत अजून खूप मागे आहे. ऋषभ पंत आणि मोहम्मद रिझवान यांच्यात कायम तुलना केली जाते.

Web Title: Mohammad Rizwan Taking Prohibited Substance Before T20 World Cup 2021 Semi Final

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top