

Mohammed Shami
ESakal
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेसह, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याला टीम इंडियामधून वगळण्यात आले आहे. शमी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळत आहे. शमीने बंगालसाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. परंतु असे असूनही त्याला संघातून वगळल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.