Mohammed Shami : बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून मोहम्मद शमीच्या नावावर शिक्कामोर्तब?

Mohammed Shami is like for like backup For Jasprit Bumrah
Mohammed Shami is like for like backup For Jasprit Bumrah esakal

Mohammed Shami is like for like backup For Jasprit Bumrah : बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सोमवारी उशिरा प्रसिद्धी पत्रक काढत जसप्रीत बुमराह अधिकृतरित्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 सामन्यासाठी मुकणार असल्याची घोषणा केली. यानंतर ऐत्यावेळी जसप्रीत बुमराहची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न संघ व्यववस्थापनासमोर उभा ठाकला आहे.

Mohammed Shami is like for like backup For Jasprit Bumrah
T20 World Cup : भारत-पाक सामन्यात 'हे' असणार अंपायर? फक्त एकाच भारतीयाला संधी

दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघात कोणच्या बदली कोणाला घ्यायच याबद्दल आधीपासूनच स्पष्टता असल्याचे सांगण्यात येते. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे 'स्टँड बायमध्ये असलेला दीपक चाहर हा भुवनेश्वर कुमारची रिप्लेसमेंट आहे. दोघेही स्विंग गोलंदाज असून संघ व्यवस्थापनच्या दृष्टीने भुवनेश्वर कुमार हा संघाची पहिली पसंती असले.'

'याचबरोबर स्टँडबायमधील दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा जसप्रीत बुमराहचा बॅक अप प्लॅन आहे. त्यामुळे बुमराहच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप खेळण्यासाठी जाणाऱ्यांच्या यादीत शमी आघाडीवरी आहे. याचबरोबर मोहम्मद सिराज देखील संघासोबत स्टँडबाय म्हणून प्रवास करणार आहे.'

सोमवारी बीसीसीआय सचिव जय शहा यांनी अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं होतं की, 'जसप्रीत बुमराह बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या सल्ल्यानंतर आयसीसी टी 20 वर्ल्डकप संघातून बाहेर पडला आहे. हा निर्णय तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर घेण्यात आला. बीसीसीआय जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट लकरच घोषित करणार आहे.'

Mohammed Shami is like for like backup For Jasprit Bumrah
Pant-Urvashi : भांडण मिटलं? उर्वशीने फ्लाइंग KISS देत केलं पंतला बर्थडे विश

भारताकडे आयसीसीची परवानगी न घेता जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट घोषित करायला 15 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. मोहम्मद शमी कोरोनाग्रस्त झाल्याने मायदेशातील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन्ही मालिकेला मुकाल होता. दरम्यान, मोहम्मद सिराजने गेल्या 2020 - 21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. दीपक चाहरने देखील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत चांगला मारा केला आहे.

भारत टी 20 वर्ल्डकपमध्ये 23 ऑक्टोबरला आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध खेळणार आहे. त्यामुळे बुमराहला रिकव्हरीसाठी खूप कमी कालावधी मिळतोय. त्यापेक्षा जसप्रीत बुमराह वर्ल्डकपनंतर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे फिट कसा होईल याकडे लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पात्र होण्यासाठी देखील जोर लावावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com