Mohammed Shami: 'शमीला अटक नका करू', 'त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच'... मुंबई-दिल्ली पोलिसांची गमतीशीर चर्चा व्हायरल

मुंबई-दिल्ली पोलिसांची गमंतीशीर चर्चा व्हायरल होत आहे
Mohammed Shami
Mohammed ShamiEsakal

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड कप 2023 मध्ये धुमाकूळ घालत आहे. बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने किवी संघाचा 70 धावांनी पराभव केला. टीम इंडिया आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये केवळ 17 सामन्यात 50 विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. कालच्या सामन्यानंतर शमीचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

देशभरात एकीकडे मोहम्मद शमीवरती कौतुकाचा वर्षाव सुरूच आहे, अशातच दुसरीकडे शमीबाबत दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करुन केलेल्या एका ट्वीटच्या चर्चा सोशल मिडीयावर जोरदार सुरू आहे.

मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. काल सामन्यावेळी सर्वांना सामना हातातून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच शमीनं डावं पलटवला. शमीचं या खेळीचं सर्वत्र कौतुक केलं आहे, अशातच दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी मोहम्मद शामीच्या गोलंदाजीसंदर्भात एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करत दिल्ली पोलिसांनी लिहलं आहे की, 'मोहम्मद शामीला अटक करू नका'. या पोस्टची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर सुरू आहे.

Mohammed Shami
Mohammed Shami: तीन वेळा केला होता जीव संपवण्याचा प्रयत्न... वडिलांचं क्रिकेटच स्वप्न पूर्ण करणाऱ्या शमीची कहाणी

काय लिहलं आहे पोस्टमध्ये?

दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करन एक पोस्ट लिहिली आहे. मोहम्मद शमीने सामन्यामध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीबाबत दिल्ली पोलिसांनी हे गंमतीशीर पोस्ट केली आहे. त्यामध्ये दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना मोहम्मद शमीला अटक करू नका, असं म्हटलं आहे.

"मुंबई पोलीस, आम्ही आशा करतो, आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शमीला अटक करणार नाही." याला उत्तर देत मुंबई पोलिसांनीही गंमतीशीर ट्वीट म्हटलं आहे की, "दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मनं चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि तुम्ही सहआरोपींची यादीही दिली नाही."

Mohammed Shami
India In World Cup Final: अंगावर काटे आणणारा क्षण! भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचताच ३२ हजार प्रेक्षकांनी गायलं वंदे मातरम, पाहा व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com