Ruturaj Gaikwad VIDEO : ऋतुराजच्या विश्वविक्रमी 'षटकातील 7 षटकार' पाहा एका क्लिकवर

Ruturaj Gaikwad Record Break 7 Sixes Video
Ruturaj Gaikwad Record Break 7 Sixes Video esakal

Ruturaj Gaikwad Record Break 7 Sixes Video : भारतीय संघातील युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमधील क्वाटर फालन सामन्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. महाराष्ट्राचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेश विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत नाबाद 220 धावांची द्विशतकी खेळी केली. याचबरोबर त्याने डावाच्या शेवटच्या षटकात तब्बल 7 षटकार मारत एकाच षटकात 7 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम देखील आपल्या नावावर केला. ऋतुराज प्रमाणे चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने देखील दमदार कामगिरी केली. त्याने 10 षटकात 53 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 58 धावांनी पराभव करत विजय हजारे ट्रॉफीची सेमी फायनल गाठली.

Ruturaj Gaikwad Record Break 7 Sixes Video
World Cup 2023 : पावसामुळे अफगाणिस्तान थेट पात्र; मात्र लंकेसह आफ्रिकेची झाली गोची

ऋतुराज गायकवाड हा आता लिस्ट A क्रिकेटमध्ये एका षटकात 7 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विरूद्ध उत्तर प्रदेश सामन्यात ऋतुराज गायकवाडने 49 व्या षटकात शिवा सिंगच्या चार चेंडूवर सलग चार षटकार मारले. त्यानंतर शिवाने पाचवा चेंडू नो बॉल टाकला. त्यावरही ऋतुराजने षटकार ठोकला होता. तसेच पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळाल्यावर त्यावरही ऋतुराजने षटकार मारला. ऋतुराजने शिवाला शेवटच्या चेंडूवर देखील दयामाया दाखवली नाही. त्याने शेवटचा चेंडू देखील सीमापार टोलवत विक्रमाला गवसणी घातली.

Ruturaj Gaikwad Record Break 7 Sixes Video
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचे पार्टीतील फोटो व्हायरल; कोण आहे तो 'मिस्ट्री बॉय'

दरम्यान, क्वार्टर फायनच्या सामन्यात महाराष्ट्राने ऋतुराजच्या नाबाद 220 धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशविरूद्ध 330 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र आर्यन जुयालच्या दमदार दीडशतकी खेळीनंतरही उत्तर प्रदेशला 330 धावांचे आव्हान पार करता आले नाही. उत्तर प्रदेशचा संपूर्ण डाव 272 धावात संपुष्टात आला. महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगरगेकरने 5 विकेट घेतल्या. त्यानेच आर्यनची 159 धावांची खेळी संपवली. सत्यजीत बच्छाव आणि काझी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेत हंगरगेकरला चांगली साथ दिली.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com