Morocco defeated the Netherlands 3-2 in a dramatic penalty shootout to qualify for the FIFA World Cup 2026 Round of 16
Netherlands vs Morocco Marathi Updates : फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा थरार आता खऱ्या अर्थाने रंगताना दिसत आहे. पाचवेळच्या विजेत्या ब्राझीलला Round of 32 मध्ये २-१ असा विजय मिळवण्यासाठी जपानच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला. तेच चारवेळच्या विजेत्या जर्मनीचे आव्हान पॅराग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये संपुष्टात आणले. १-१ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये दोन्ही संघांचे प्रत्येकी २ प्रयत्न चुकल्याने तिथेही ३-३ अशी बरोबरी झाली. पण, सडन डेथमध्ये पॅराग्वेने गोल करून बाजी मारली. मंगळवारचा तिसरा सामना नेदरलँड्स विरुद्ध मोरोक्को यांच्यातही चुरस रंगली आणि पेनल्टी शूट आऊटमध्ये मोरोक्कोने बाजी मारली.