'फलंदाज' साऊदीची कसोटीत कमाल; सचिन, पॉटिंग अन् डिव्हिलियर्सच्याही गेला पुढे

Most Sixes in Test Tim Suthee Surpasses Sachin Tendulkar Ricky Ponting AB De Villiers
Most Sixes in Test Tim Suthee Surpasses Sachin Tendulkar Ricky Ponting AB De Villiers esakal
Updated on

Most Sixes in Test: न्यूझीलंडचा वेगावान गोलंदाज टीम साऊदी आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तो न्यूझीलंडच्या तीनही क्रिकेट प्रकारातील एक प्रमुख गोलंदाज आहे. मात्र या गोलंदाज असलेल्या साऊदीने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने कमाल केली. (Most Sixes in Test Tim Suthee Surpasses Sachin Tendulkar Ricky Ponting AB De Villiers)

इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात त्याने संघासाठी महत्वपूर्ण 33 धावा केल्या. 29 चेंडूत केलेल्या या आक्रमक खेळीत त्याने 5 चौकार आणि एक षटकार लगावला. याचबरोबर त्याच्या कसोटीत क्रिकेटमधील षटकारांचा आकडा 76 वर पोहचला. त्याचा हा षटकारांचा आकडा कसोटी क्रिकेटमधील अनेक दिग्गज फलंदाजांपेक्षाही जास्त आहे.

Most Sixes in Test Tim Suthee Surpasses Sachin Tendulkar Ricky Ponting AB De Villiers
रणजीचे हेडमास्तर : कॅप्टनला लग्नासाठी दिलेली फक्त 2 दिवसांची सुट्टी

टीम साऊदीने कसोटी षटकारांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर, रिकी पॉटिंग आणि एबी डिव्हिलियर्स देखील मागे टाकले आहे. साऊदीने 88 कसोटी सामन्यात 1855 धावा करत 187 चौकार आणि 76 षटकार मारले आहेत. तर दुसरीकडे भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यात 69 षटकार मारले आहेत. रिकी पॉटिंगने 73 षटकार तर डिव्हिलियर्सने 64 षटकार मारले आहेत.

Most Sixes in Test Tim Suthee Surpasses Sachin Tendulkar Ricky Ponting AB De Villiers
रोहितच्या टी 20 कॅप्टन्सीबाबत विरेंद्र सेहवागचं मोठं वक्तव्यं

कसोटी क्रिकेटच्या इतिहालात सर्वाधिक षटकार मारण्याचे रेकॉर्ड न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि सध्या इंग्लंड संघाचा प्रशिक्षक ब्रॅडन मॅक्युलमच्या नावावर आहे. त्याने कसोटी कारकिर्दित 107 षटकार मारले आहेत. त्यानंतर या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकिपर अॅडम गिलख्रिस्ट आणि बेन स्टोक्स प्रत्येकी 100 षटकार मारून संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ख्रिस गेलने कसोटीत 98 षटाकर मारले आहेत. जॅक कॅलिस या यादीत 97 षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com