रोहितच्या टी 20 कॅप्टन्सीबाबत विरेंद्र सेहवागचं मोठं वक्तव्यं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virender Sehwag Big Statement About Rohit Sharma T20I Captaincy

रोहितच्या टी 20 कॅप्टन्सीबाबत विरेंद्र सेहवागचं मोठं वक्तव्यं

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामावीर विरेंद्र सेहवागने भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं व्यक्तव्य केलं आहे. विरेंद्र सेहवागच्या मते 35 वर्षाच्या रोहित शर्माचा भार थोडा कमी केला पाहिजे त्यामुळे त्याची टी 20 कर्णधारपदाच्या कार्यातून मुक्तता केली पाहिजे. (Virender Sehwag Big Statement About Rohit Sharma T20I Captaincy)

हेही वाचा: रणजीचे हेडमास्तर : कॅप्टनला लग्नासाठी दिलेली फक्त 2 दिवसांची सुट्टी

रोहित शर्मा दुखापती आणि वर्कलोड मॅनेजमेंटमुळे भारताच्या सगळ्या सामन्यात कर्णधार म्हणून उपस्थित राहू शकलेला नाही. याबाबत पीटीआयशी बोलताना विरेंद्र सेहवाग म्हणाला की, 'जर टी 20 साठी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या मनात अजून कोणी असेल तर मला असे वाटते की रोहित शर्माला या कार्यभारातून मुक्त करून दुसऱ्या व्यक्तीला टी 20 संघाचे कर्णधापद द्यायला हवे.'

सेहवाग म्हणाला की, 'एक म्हणजे यामुळे रोहित शर्माला त्याचे वय पाहता त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंट आणि मानसिक थकव्यावर चांगले काम करता येईल. दुसरं म्हणजे जर टी 20 संघासाठी दुसरा कर्णधार नियुक्त केला तर रोहित शर्माला टी 20 मधून ब्रेक घेणे सोपे जाईल आणि त्याला कसोटी आणि वनडेसाठी चांगल्या प्रकारे तयारी करता येईल.'

हेही वाचा: Video: सामन्यादरम्यान ब्रिटिश पंतप्रधानांच्या मागे लागले पोलिस?

मात्र विरेंद्र सेहवाग हेही सांगायला विसला नाही की जर संघ व्यवस्थापनाने भारताच्या तीनही प्रकारात एकच कर्णधार असावा असे ठरवले असेल तर रोहित शर्मा शिवाय दुसरा चांगला पर्याय सध्या तरी समोर दिसत नाही. 'जर भारतीय थिंक टँक जर एकच व्यक्ती भारताच्या तीनही प्रकारातील संघाचा कर्णधार असेल या योजनेनुसारच जाणार असेल तर मला असे वाटते की रोहित शर्माच यासाठी योग्य व्यक्ती आहे.'

सध्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात अनेक चाचपण्या सुरू आहेत. याबाबत भारताचे पहिले तीन बॅट्समन कोण असतील असे सेहवागला विचारले असता त्याने 'टी 20 मध्ये हार्ड हिटरचा विचार केला तर भारताकडे अनेक पर्याय आहेत. मला वैयक्तिकरित्या रोहित शर्मा, इशान किशन आणि केएल राहुल हे तीन टॉप ऑर्डरचे फलंदाज ऑस्ट्रेलियातील वर्ल्डकपमध्ये खेळावेत असे वाटते.'

Web Title: Virender Sehwag Big Statement About Rohit Sharma T20i Captaincy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..