'MR India' बॉडी बिल्डरचा 'निरोप'

Senthil Kumaran Selvarajan
Senthil Kumaran SelvarajanInstagram

बॉडी बिल्डर सेंथिल कुमारन सेलवारजन (Senthil Kumaran Selvarajan) याचे हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. बॉडीबिल्डिंग क्षेत्रात खूप छोट्या वयात त्याने एक विशिष्ट उंची गाठली होती. मिस्टर इंडियासह Senthil Kumaran याने 2016 मध्ये मिस्टर आशियाई आणि 2019 मध्ये मिस्टर वर्ल्डचा किताब पटकावला होता. सेंथिल कुमारन सोशल मीडिया चांगलाच सक्रिय होता. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरुन तो आपल्या चाहत्यांना बॉडी बिल्डिंगच्या टिप्स द्यायचा. हद्यविकाराच्या झटक्याने सेंथिल कुमारनचा मृत्यू झाल्याने त्याच्या चाहत्यावर्गाला चांगलाच धक्का बसला आहे.

Senthil Kumaran Selvarajan
'आधारस्तंभ गमावला', वडिलांच्या निधनानंतर पीयूष चावलाची पोस्ट

सेंथिल कुमारन हा मुळचा तमिळनाडूचा होता. 2013 मध्ये शेरू क्लासिक बॉडीबिल्डिंग स्पर्धा जिंकून त्याने मिस्टर इंडियाचा किताब पटकवला होता. पिळदार शरिर आणि आकर्षक बॉडीतील आपले फोटो तो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायचा. इन्स्टाग्रामवर त्याचे 20 हजाराहून अधिक फॉलोवर्स होते. त्याच्या अचानक जाण्याने फिटनेस जगतातील एक आदर्श व्यक्ती गमावल्याच्या प्रतिक्रिया बॉडी बिल्डिंग क्षेत्रीशी निगडीत लोकांकडून उमटत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com